शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

फिरायला गेलेल्या व्यक्तीला छोटीशी चूक पडली महागात, भरावा लागणार ७ लाख रूपये दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 11:55 IST

एक छोटीशी चूक त्याला चांगलीच महागात पडली आणि आता त्याला ७ लाख रूपये दंड भरावा लागणार आहे. ही व्यक्ती हा दंड भरल्याशिवाय तिथून जाऊही शकत नाही.

लोक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात. एन्जॉय करतात. पण जिथेही तुम्ही फिरायला जाता तेथील नियमही जाणून घेतले पाहिजे आणि ते फॉलो केले पाहिजे. असं केलं नाही तर तुम्हाला तिथे फिरायला जाणं महागातही पडू शकतं. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं. एक व्यक्ती परदेशात फिरायला गेली होती. पण एक छोटीशी चूक त्याला चांगलीच महागात पडली आणि आता त्याला ७ लाख रूपये दंड भरावा लागणार आहे. ही व्यक्ती हा दंड भरल्याशिवाय तिथून जाऊही शकत नाही.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणारा टायलर वेनरिचने ऐकलं होतं की, ब्रिटनमधील तुर्क आणि कॅकोस आयलॅंड फारच सुंदर आहेत. अनेक वर्षांपासून तो तिथे जाण्याचा प्लान करत होता. एक दिवस बॅग भरली आणि तो तिथे फिरायला निघाला. मित्रांसोबत आयलॅंड फिरला. गन रेंजमध्येही फिरला. इथेच चुकीने त्याने बंदुकीच्या दोन गोळ्या बॅगेत ठेवल्या. त्याला जराही अंदाज नव्हता की, हे त्याला महागात पडणार आहे.

फिरून झाल्यावर परत जाण्यासाठी क्रूजवर चढण्याआधी त्याला रोखण्यात आलं. कारण त्याने बॅगमध्ये ९ एमएमच्या दोन गोळ्या ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्याला लगेच अटक केली. आता हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. कोर्टाने त्याला ९ हजार डॉलर दंड ठोठावला आहे. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ७.५ लाख रूपये होते. इतकंच नाही तर त्याला तीन आठवणे न्यायालयीन कोठडीत रहावं लागणार आहे. ही शिक्षा पूर्ण झाल्यावरच त्याला आयलॅंडवरून जाता येणार आहे.

ब्रिटिश कायद्यानुसार, तुर्क आणि कॅकोस आयलॅंडमध्ये जर एखादी बंदूक किंवा बंदुकीच्या गोळ्यांसोबत कुणी आढळलं तर त्यांना १२ वर्षांची शिक्षा होऊ शकते. ब्रिटनमध्ये सतत गोळीबाराच्या घटना घडत असलेल्याने हा कायदा बनवण्यात आला होता. आतापर्यंत कोणत्याही पर्यटकाला इतकी शिक्षा मिळाली नाही. वेनरिचच्या आधीही चार पर्यटक अशा स्थितीत अडकले होते. तेव्हा कुणाला ५ लाख तर कुणाला ८ लाख रूपये दंड ठोठावण्यात आला होता.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके