शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'या' व्यक्तीला आहे जगात सर्वात लांब नाक, अजूनही रोज वाढत आहे साइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 16:23 IST

Longest Nose : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने मेहमत ओजीयुरेकच्या रेकॉर्डची घोषणा करताना सांगितलं होतं की, त्यांचं नाक जगातल्या जिवंत व्यक्तींमध्ये सर्वात लांब आहे.

तुम्हाला माहीत आहे का जगात सर्वात लांब नाकाचा (Longest Nose)  रेकॉर्ड कुणाच्या नावावर आहे? तुर्कीमध्ये राहणाऱ्या मेहमत ओजीयुरेकचं (Mehmet Özyürek)  नाक जगात सर्वात लांब आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नावही नोंदवलं आहे. खास बाब ही आहे की, त्यांचं नाक दिवसेंदिवसे वाढत आहे. म्हणजे येणाऱ्या दिवसात त्यांचं नाक ३.५ इंचापेक्षाही लांब होऊ शकतं.

११ वर्षापासून कायम आहे रेकॉर्ड

‘डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार, तुर्की येथे राहणारा ७१ वर्षीयय मेहमत ओजीयुरेक जगातील एकमेव जिवंत व्यक्ती आहे ज्याचं नाक ३.५ इंच (८.८सेमी) लांब आहे. साधारण ११ वर्षाआधी आपल्या नाकासाठी त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं होतं. त्यांचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही तोडू शकलेलं नाही. ते म्हणाले की, त्यांच्या नाकाची लांबी अजूनही वाढत आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने मेहमत ओजीयुरेकच्या रेकॉर्डची घोषणा करताना सांगितलं होतं की, त्यांचं नाक जगातल्या जिवंत व्यक्तींमध्ये सर्वात लांब आहे. असं असलं तरी इतिहासात सर्वात लांब नाकाचा रेकॉर्ड इंग्लिशमॅन थॉमस वेडर्सच्या नावावर आहे. १८व्या शतकातील इंग्लिशमॅनचं नाक आश्चर्यकारकपणे ७.५ इंच लांब होतं. पण ते आता जिवंत नसल्याने हा रेकॉर्ड मेहमत यांच्या नावे आहे.

खिल्ली उडवत होते लोक

मेहमत ओजीयुरेक यांना त्यांच्या नाकामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लोक त्यांची खिल्लीही उडवतात. ते म्हणतात की, 'नाक चेहऱ्याची शोभा वाढवतं. जर नाक योग्य आकारात नसेल तर चेहरा अजब दिसायला लागतो. माझं लांब नाक बघून लोक माझी खिल्ली उडवत होते. माझ्यावर हसत होते. आधी खूप वाईट वाटायचं. पण मग सवय झाली. आता त्याचा नाकामुळे माझ्या नावावर रेकॉर्ड आहे'. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड