शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलंच! बसमधून प्रवास करणाऱ्या कोंबड्याचं कंडक्टरनं कापलं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:05 IST

TSRTC bus conductor : ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तुम्ही जेव्हाही बसमधून प्रवास करता तेव्हा तुम्ही प्रवासाचे भाडे जरूर भरले असेल, पण तुम्ही कधी ऐकले आहे का की बसमध्ये प्रवास करणाऱ्या जनावरांकडून किंवा पक्ष्याकडूनही भाडे आकारले जाते? जर नसेल तर अशीच एक घटना घडली आहे. एका बस कंडक्टरने बसमध्ये प्रवास करणाऱ्या कोंबड्याचे प्रवास भाडे आकारले आहे. दरम्यान, ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (TSRTC) बसमध्ये प्रवास करण्यासाठी एका कोंबड्याचे 30 रुपये आकारले. तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात मंगळवारी ही विचित्र घटना घडली. ज्यावेळी टीएसआरटीसी बस कंडक्टरने एका प्रवाशाला कोंबडा घेऊन प्रवास करताना पाहिले आणि त्याच्याकडून कोंबड्याच्या प्रवासाचेही तिकीट शुल्क आकारले.

30 रुपये शुल्क आकारलेबस कंडक्टर जी तिरुपती यांना पेद्दापल्ली ते करीमनगरच्या प्रवासादरम्यान एका प्रवाशाने कापडात गुंडाळलेला कोंबडा लपवल्याचे दिसले. यानंतर जी तिरुपती यांनी आरटीसी बसमधील सर्व सजीव वस्तूंचे शुल्क आकारले जाते असे सांगत प्रवासी मोहम्मद अली यांना 30 रुपये देण्यास सांगितले. मोहम्मद अली यांनी सुरुवातीला विरोध केला, पण बस कंडक्टर जी तिरुपती यांनी कोंबडा घेऊन जाण्यासाठी तिकीटाचे शुल्क भरावे लागेल असा आग्रह केल्याने त्यांनी नंतर होकार दिला.

अधिकाऱ्यांकडून घटनेची दखलकंडक्टर आणि प्रवासी यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीएसआरटीसी अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली. टीएसआरटीसी गोदावरीखानी डेपो मॅनेजर व्ही व्यंकटेशम म्हणाले की, कंडक्टरने प्रवाशाला कोंबड्यासह खाली उतरण्यास सांगितले पाहिजे होते, कारण टीएसआरटीसी नियमांनुसार बसमध्ये प्राण्यांना परवानगी नाही. तसेच, प्रवाशाने कोंबडा कापडाखाली लपवल्याने कंडक्टरच्या लक्षात आले नसावे. याचबरोबर, निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि प्रवाशाकडून कोंबडा घेऊन नेण्याचे शुल्क आकारल्याबद्दल कंडक्टरकडून स्पष्टीकरण मागवले जाईल, असे व्यंकटेशम म्हणाले. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके