शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Shocking Trending News: लग्नमंडपात अचानक आली शवपेटी, झाकण उडघताच पाहुण्यांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 20:24 IST

लग्नाच्या ठिकाणी शवपेटी का आली, त्यातून काय निघालं... वाचा सविस्तर

Shocking Trending News: लग्नात, लोक वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. जोडप्याचा संसार सुखाचा व्हावा अशी साऱ्यांचीच इच्छा असते. परंतु अशी कल्पना करा की लग्नाच्या मंडपात सारे जण प्रसन्न वातावरण असताना अचानक कॉफीन (शवपेटी) आणली गेली तर.... असं काही घडलं तर नक्कीच तेथे उपस्थित सर्व पाहुणे मंडळींना नक्कीच धक्का बसेल. असाच एक प्रकार नुकताच घडला. एका ठिकाणी ख्रिश्चन पद्धतीने होणाऱ्या लग्नासाठी सारे जण जमले होते. त्याच वेळी तेथे एक कॉफीन आणली गेली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी ती कॉफीन आणली गेली, त्यावेळी ती उघडल्यानंतर जे दिसलं ते अजूनच धक्कादायक होतं.

ही घटना अमेरिकेतील एका शहरातील आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, एक व्यक्ती आपल्या मैत्रिणीसोबत विवाहबद्ध होणार होता. त्याआधी दोघेही बराच काळ एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. काही काळापूर्वी मुलाने मुलीला लग्नासाठी प्रपोज केले. मुलीनेही होकार दिला. त्यानंतर त्यांचा लग्नाचा दिवस जेव्हा जवळ आला, त्यावेळी जे घडलं ते साऱ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं.

शवपेटी पाहून लोक आश्चर्यचकित झाले

लग्नाच्या दिवशी मंडपात सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. सारेच आनंदात होते. लग्नाचा माहोल होता. वधू नटून सजून लग्नमंडपात आली. सारेच त्यानंतर तिच्या सौंदर्याचे कौतुक करू लागले. अशा वेळी अचानक त्या लग्नमंडपाच्या आवारात एक शवपेटी घेऊन चार जण आले. कॉफीन पाहून पाहुण्यांना धक्काच बसला. त्यानंतर बराच वेळ लग्नमंडपात वातावरण गंभीर झाले होते. एका बाजूला लग्नसमारंभात पाहुण्यांचा मेळा होता. दुसरीकडे एक ट्रक तिथे पोहोचला. यानंतर काही जणांनी ट्रकमधून शवपेटी काढली आणि लग्नमंडपात घेऊन गेली. पण शवपेटी उघडताच लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्या शवपेटीतून चक्क नवरदेव बाहेर आला.

याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. नवरदेवाची ही कृती पाहून काही पाहुणे भडकले तर काहींनी या गमतीची मजा घेतली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके