शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा स्पीड दिवसाच्या तुलनेत रात्री जास्त का असतो? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 11:46 IST

Trains Speed At Night : कधी नोटीस केलं असेल की, रेल्वे दिवसाच्या तुलनेत रात्री अधिक वेगाने धावते. मात्र, याचं कारण तुम्हाला माहीत नसेल.

Trains Speed At Night :  भारतीय रेल्वे देशाची लाइफलाईन आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. आपण सगळ्यांनीच कधीना कधी रेल्वेने प्रवास असेलच. खिडकीजवळ बसून बाहेरचा सुंदर नजारा पाहिला असेल. रेल्वेच्या प्रवासाची आपली एक वेगळीच मजा असते. पण कधी नोटीस केलं असेल की, रेल्वे दिवसाच्या तुलनेत रात्री अधिक वेगाने धावते. मात्र, याचं कारण तुम्हाला माहीत नसेल.

काय आहे मुख्य कारण?

दिवसादरम्यान तुम्ही लोकांना रेल्वे रूळ ओलांडून इकडे-तिकडे जाताना पाहिलं असेलच. तसा तर हा कायद्याने गुन्हा आहे. पण अनेक लोक याकडे फारसं लक्ष देत नाहीत. इतकंच नाही तर दिवसादरम्यान प्राणीही रेल्वे रूळ क्रॉस किंवा रेल्वे रूळावर थांबतात.

रात्रीच्या वेळी मनुष्य आणि प्राणी दोघांचीही ये-जा कमी होते.  ज्याचा लाभ रेल्वे चालकाला मिळतो. त्यांना दिवसांच्या तुलनेत रात्री हाय स्पीड रेल्वे चालवल्याने होणाऱ्या दुर्घटनांची चिंता कमी राहते. यामुळे रात्री रेल्वेचा स्पीड जास्त राहतो.

रात्री नसतं मेंटेनन्सचं काम

तुम्ही दिवसावेळी रेल्वेने प्रवास करताना नोटीस केलं असेल की, रेल्वे रूळांवर कधी कधी मेंटेनन्सचं काम सुरू असतं. ज्यामुळे रेल्वे थांबवली जाते. याची शक्यता रात्री कमी असते. रात्रीच्या वेळी मेंटेनन्सचं काम शक्यतो केलं जात नाही. त्यामुळे काही अपघात होण्याची चिंता न करता रेल्वेचा स्पीड वाढवणं सोपं होतं.

रात्री सिग्नल जास्त स्पष्ट दिसतात

तुम्ही कधीना कधी नोटीस केलं असेल की, एखादं स्टेशन आलं की, रेल्वेचा स्पीड स्लो केला जातो आणि सिग्नलची वाट पाहिली जाते. जेणेकरून त्यांना समजावं की, रेल्वे रूळ रिकामा आहे. हे सिग्नल रात्री जास्त स्पष्ट दिसतात. रेल्वे चालकाला ‘लोटो पायलट‘ म्हटलं जातं. सिग्नल त्यांना दुरूनच दिसतात. त्यामुळे स्टेशन येण्याआधी त्यांना स्पीड कमी करावा लागत नाही.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके