शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

Toraja Indonesia: येथे मृत व्यक्तीला दिले जाते गरमागरम जेवण, मृत देहाचे फोटो पाहुन उडेल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:50 IST

या ठिकाणचे लोक त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा मृतदेह स्वत: जवळच ठेवतात. एवढंच नाही तर मृत शरीराला दररोज गरमागरम जेवणही दिलं जातं. या विचित्र परंपरेचे काही फोटो समोर आले आहेत. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

जगात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या परंपरा पाहायला मिळतात. काही परंपरा खूपच विचित्र (Weird Rituals) असतात. त्यांच्याबद्दल समजल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. काही देशांतील परंपरा तर फारच भयानक आहेत. अशीच एक विचित्र परंपरा इंडोनेशियामध्ये (Indonesia) पाळली जाते. या ठिकाणचे लोक त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा मृतदेह स्वत: जवळच ठेवतात. एवढंच नाही तर मृत शरीराला दररोज गरमागरम जेवणही दिलं जातं. या विचित्र परंपरेचे काही फोटो समोर आले आहेत. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

इंडोनेशियामध्ये पाळल्या जाणाऱ्या या परंपरेला 'तोराजा' (Toraja) या नावानं ओळखलं जातं. ही परंपरा या ठिकाणी खूपच प्रसिद्ध आहे. या परंपरेनुसार, जेव्हा घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तिच्यावर अंत्यसंस्कार (Funeral) केले जात नाहीत. कुटुंबीय त्या व्यक्तीचा मृतदेह त्यांच्याजवळच ठेवतात. घरातील इतर सदस्यांप्रमाणे या मृतदेहाला वागणूक दिली जाते. एवढंच नाही तर मृतदेहाला दररोज जेवणही (Food) दिलं जातं. कुटुंबातील इतर सदस्य या मृतदेहाची एखाद्या जिवंत व्यक्तीप्रमाणं सेवा करतात.  (Food for Dead Body)

येथील लोकांचा असा विश्वास आहे की, कोणीही मरत नाही, तो फक्त आजारी (Sick) पडतो. त्यामुळे मृत व्यक्तीला आजारी समजून तशी तिची सेवा केली जाते. घरात पाहुणे आले तर तेदेखील मृतदेहाच्या प्रकृतीची विचारपूस करतात. घरातील एका खोलीत मृतदेह ठेवला जातो. हे दृश्य अनेक घरांमध्ये दिसतं. घरात मृतदेह असूनही इतर कुटुंबीय पूर्णपणे सामान्य जीवन जगतात. मृतदेह असलेल्या घरात गेल्यानंतर तिथे एखाद्याचा मृत्यू झाला आहे, असं अजिबात वाटत नाही. या मृतदेहांनाही आंघोळ (Bath) घालण्यात येते आणि त्यांचे कपडेही बदलेले जातात.

आता तुम्ही विचार करत असाल की, मृतदेह इतके दिवस घरात राहिला तरी तो कुजत का नाही? यामागे एक विशेष कारण आहे. या मृतदेहांवर विशिष्ट प्रकारची पानं (Leaves) आणि औषधं रगडली जातात. त्यामुळे मृतदेह खराब होत नाही. जेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यूची योग्य वेळ आली आहे, असं इतर लोकांना वाटतं तेव्हा ते मृतदेहावर मोठ्या थाटामाटात अंत्यसंस्कार करतात. या परंपरेत मृतदेह जाळला (Burn) किंवा पुरला (Bury) जात नाही. गावाजवळील डोंगरातील एखादा खडक कापून मृतदेहाची पेटी त्यामध्ये ठेवतात.

इंडोनेशियातील ही परंपरा इतर देशांतील लोकांना विचित्र वाटते. मात्र, तेथील अनेक लोकांचा या परंपरेवर विश्वास असून ते तिचं काटेकोरपणे पालन करतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके