शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

टूथब्रशमुळे झाला पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा भांडाफोड, महिलेला बसला धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:17 IST

Viral News : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, महिलेला तिच्या पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची सुगावा एका टूथब्रशच्या माध्यमातून लागला.

Viral News : अनेकदा तुम्ही वाचलं असेल की, एका पतीनं त्याच्या पत्नीला दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडलं किंवा पत्नीनं पतीचं अफेअर उघड केलं. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या अनेक अजब घटना समोर येत असतात. अनेकदा तर खूप नाटकीय पद्धतीनं या गोष्टींचा खुलासा होतो. ब्रिटनमधील एका महिलेला तिच्या पतीच्या अफेअरची माहिती एका वेगळ्या वस्तूमुळे मिळाली. ज्यावर कुणाचाही सहज विश्वास बसणार नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, महिलेला तिच्या पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची सुगावा एका टूथब्रशच्या माध्यमातून लागला.

झालं असं की, महिला आपल्या मुलांना ब्रश करण्याची सवय लावण्यासाठी एका स्मार्ट अॅपचा वापर करत होती. हे अ‍ॅप टूथब्रशसोबत सिंक होत होतं आणि याची माहिती देत होतं की, ब्रश कधी आणि किती वेळ करण्यात आलं. ही सुविधा मुलांच्या हेल्थ ट्रॅकिंगसाठी होती. मात्र, याद्वारे तिला तिच्या पतीच्या अफेअरबाबत समजलं.

कसा झाला खुलासा?

महिलेने सुरूवातीला नोटीस केलं की, ब्रशचा वापर अशावेळी केला जात आहे, जेव्हा घरी कुणीच नसतं. खासकरून शुक्रवारी सकाळी. यावेळी सामान्यपणे महिलेचा पती ऑफिस राहत होता. आधी तर महिलेला हा केवळ एक योगायोग वाटला. पण दर शुक्रवारी तिला तेच दिसू लागलं. तेव्हा तिचा संशय आणखीन वाढला.

महिलेनं आणखी खोलात जाऊन माहिती घेतली तर तिच्या लक्षात आलं की, तिचा पती शुक्रवारी ऑफिसला न जाता घरीच राहत होता आणि तो एका महिला सहकाऱ्यासोबत वेळ घालवत होता. महिलेच्या हेही लक्षात आलं की, टूथब्रशचा वापर तेव्हाच होत होता जेव्हा ते दोघे घरात एकटे राहत होते. टूथब्रशचा कनेक्शन अ‍ॅपसोबत तसंच राहिलं आणि सगळा डेटा पतीची पोलखोल करत राहीला.

ही घटना सोशल मीडियावर समोर येताच चांगलीच चर्चा रंगली. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागले. कुणी म्हणाले की, "टूथब्रश नातं तोडलं". तर कुणी म्हणाले की, "आता महिलेचा पती आयुष्यात पुन्हा कधीच ब्रश करणार नाही".

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल