शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीनंतर बाळाला जमिनीत जिवंत गाडून पळाली आई, अपंग कुत्र्याने दिलं बाळाला जीवनदान! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 14:11 IST

कुत्रा किती हुशार आणि प्रामाणिक प्राणी असतो हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. कुत्र्यांचा हुशारपणा सिद्ध करणारी एक आश्चर्यकारक घटना समोर आलं आहे.

कुत्रा किती हुशार आणि प्रामाणिक प्राणी असतो हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. कुत्र्यांचा हुशारपणा सिद्ध करणारी एक आश्चर्यकारक घटना समोर आलं आहे. थायलॅंडमध्ये काही दिवसांपूर्वी अशी एक घटना घडली जी वाचून तुम्हाला धक्काही बसेल आणि आनंदही होईल. एका तीन पायांच्या कुत्र्याने एका नवजात बाळाचा जीवनदान देण्याचं काम केलंय. या बाळाची १५ वर्षीय आई त्याला जिवंत जमिनीत गाडून गेली होती. ही घटना थायलॅंडच्या कोरट परिसरातील आहे आणि ज्या कुत्र्याने हे आश्चर्यकारक काम केलंय त्याचं नाव पिंग-पोंग आहे. 

द वर्ल्ड न्यूज ऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, पिंग-पोंगने एका अपघातात त्याचा एक पाय गमावला होता. एक दिवस तो अचानक मैदानात जोरजोरात भुंकू लागला आणि जमीन उकरू लागला. इतक्यात पिंग-पोंगचा भूंकण्याचा आवाज ऐकून त्याचे मालक बाहेर आलेत. जिथे पिंग-पोंग जमीन उकरत होता तिथे त्याच्या मालकांना एक नवजात बाळाचा पाय दिसला. नंतर त्यांनी माती बाजूला करून बाळाला बाहेर काढले.

कुत्र्यामुळे बाळ सुखरूप 

बाळाला जमिनीतून काढून वेळीच रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता बाळाची स्थिती स्थिर असून त्याचं वजन २.३ किलो आहे. या बाळाचा जीव वाचवल्यावर पिंग-पोंग गावात हिरो ठरला आहे. काही वर्षांपूर्वी एका अपघातात पिंग-पोंगने पाय गमावला होता. तरी सुद्धा तो गावातील सर्वात अ‍ॅक्टिव्ह कुत्रा आहे. 

बाळाच्या आईला अटक

दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार, नवजात बाळाच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. तिचं वय केवळ १५ वर्ष असून समाजाच्या भीतीने तिने बाळाला जिवंत दफन केले होते. आता तिच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

टॅग्स :ThailandथायलंडJara hatkeजरा हटकेdogकुत्रा