लंडन : इंग्लंडमधील तीन शाळकरी मुली दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी सिरियाला गेल्याचे वृत्त आहे. दोघींच्या कुटुंबियांनी त्यांना घरी परतण्यासाठी भावनिक आवाहन केले आहे.कादिजा सुलताना (१७), शमीमा बेगम (१५) आणि अन्य एक (१५) (हिचे नाव जाहीर करू नका असे तिच्या कुटुंबियांनी म्हटले आहे) अशा तिघी १७ फेब्रुवारीला लंडनमधील घरून इस्तंबूलला विमानाने गेल्या. कुटुंबियांनी कादिजा गेल्यामुळे आम्ही खूप हताश झाल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले. सुलतानाच्या कुटुंबियांनी म्हटले आहे की, आम्ही सगळेच तुझ्यावर प्रेम करतो. गेले चार दिवस भयानक स्वप्नासारखे होते. आम्हा सगळ्यांनाच विशेषत: आईला तुझी खूप आठवण येत आहे. तू नसल्यामुळे पहिल्यासारखे काहीही राहिलेले नाही.’ शमीमाच्या कुटुंबियांनी आम्हाला तिची ‘अत्यंत चिंता’ असल्याचे म्हटले आहे. सिरिया हा अत्यंत धोकादायक देश असून तेथे तू जावे असे आम्हाला वाटत नाही, असेही शमीमाच्या कुटुंबियांनी म्हटले. या तिन्ही मुली अभ्यासात खूप हुशार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
तीन मुलींना घर वापसीचे आवाहन
By admin | Updated: February 23, 2015 05:43 IST