Viral Video : सगळ्याच आई-वडिलांना वाटत असतं की, त्यांच्या मुलांनी शिकून खूप मोठं व्हावं. मोठी नोकरी मिळवावी. त्यासाठी आई-वडील खूप मेहनत घेतात. मुलांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतात. कारण आजकाल स्पर्धा खूप वाढली आहे. शिक्षणाचा खर्चही खूप वाढला आहे. मात्र, कोलकाता येथील या पालकाचं शालेय शिक्षणावर वेगळंच मत आहे. हे पालक आपल्या मुलांना शाळेतच पाठवत नाही. त्यांचं मत आहे शाळेत पाठवून त्यांना त्यांचा आणि मुलांचा वेळ वाया घालवायचा नाहीये. हे पालक त्यांच्या मुलांना पारंपारिक पद्धतीनं शिक्षण देत आहेत.
मुलांना कसं शिकवतात पालक
अभिनेत्री आणि इंफ्लुएंसर शहनाज ट्रेजरीवाला या परिवाराला भेटली आणि त्यांच्याबाबत जाणून घेतलं. याचा व्हिडीओ तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये तिनं सांगितलं की, हे कपल कधीही आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही. अभिनेत्रीसोबत बोलताना मुलांच्या वडलांनी सांगितलं की, 'शाळेत मुलांना पाठवणं वेळ वाया घालवणं आहे. आम्ही ट्रॅव्हलिंग आणि प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये विश्वास ठेवतो. त्यामुळे आम्ही जास्त वेळ प्रवास करतो'. कपलनं पुढे सांगितलं की, शाळेत न जाण्याला त्यांनी एक्सपिरिअन्स बेस्ड मेथड म्हटलं. यात ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातून वर्कशॉप, कला आणि साहित्यही शिकवलं जातं. या कपलच्या मुलाला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे आणि तो क्रिकेटच्या माध्यमातून गणित शिकत आहे.
कसं बनेल मुलांचं करिअर?
शाळेत न जाणं म्हणजे कोणता पॅटर्न नाही, करिकुलम नाही आणि ना कोणता दबाव. यात जीवनच तुम्हाला सगळं काही शिकवतं. जेव्हा वडिलांना मुलांच्या करिअरबाबत विचारलं तर ते म्हणाले की, 'आम्ही त्यांना उद्योगपती बनण्यासाठी तयार करत आहोत. त्यामुळे मला कशाचीही चिंता नाही. आमची मुलं अशा शिक्षणाला एन्जॉय करत आहेत'. पालकांचा हा अजब निर्णय पाहून लोकही अवाक् झाले आहेत.
लोक काय म्हणाले?
एका यूजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, 'भारतात शिक्षणाचा व्यवसाय झाला आहे, अशात या पालकांचा हा निर्णय खरंच योग्य आहे'. दुसऱ्यानं लिहिलं की, 'जर तुमच्याकडे पैसे असतील तर चिंतेची काही बाब नाही'. तिसऱ्यानं लिहिलं की, 'ही मुलं एक दिवस देशाचं नाव मोठं करतील'. चौथ्यानं लिहिलं की, 'मी सुद्धा माझ्या मुलांना असंच शिकवणार'.