शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जगातला सर्वात वाईट मोबाईल नंबर, ज्याला मिळाला त्याचा मृत्यू झाला; आता घ्यायला घाबरतात लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 14:32 IST

हा नंबर घेणाऱ्यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालीय दहशत...

आपण या पृथ्वीवरील अनेक भीतीदायक ठिकाणांसंदर्भात ऐकले अथवा वाचले असेल. जगात अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांचे नाव ऐकले तरी लोकांचा थरकाप उडतो. मात्र, आपण कधी अशाच भयावह फोन नंबरसंदर्भात ऐकले आहे का? आज आम्ही आपल्याला एका अशाच वाईट आणि भयावह फोन नंबर संदर्भात सांगणा आहोत. धक्कादायक गोष्ट म्हणजे, ज्याने कुणी हा फोन नंबर घेतला त्याचा मृत्यू झाला आहे. (Haunted Mobile Number)

जगातील सर्वात वाईट आणि भयावह नंबर -इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हा जगातील एवढा वाईट नंबर आहे, की ज्याने कुणी तो घेतला त्याच्या घरापर्यंत मृत्यू पोहोचला. एक-दोन नव्हे, तर गेल्या तब्बल 20 वर्षांपासून असेच सुरू आहे. या भयावह मोबाईल नंबरची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे. आतापर्यंत तीन जणांना हा फोन नंबर मिळाला आहे आणि या तिघांचाही अत्यंत वाईट पद्धतीने मृत्यू झाला आहे. या तिघांसोबत एवढी वाईट घटना घडली, की ते जाणून कुणाचाही थरकाप उडेल.

हा फोन नंबर बल्गेरियातील आहे. हा नंबर सर्वप्रथम मोबिटेल कंपनीच्या सीईओंनी घेतला होता. त्याचे नाव व्लादिमीर गोसनोव्ह असे होते. त्यांनी 0888888888 हा फोन नंबर स्वतःसाठी जारी केला होता. त्यांनी 2000 मध्ये हा नंबर जारी केला होता. यानंतर दुसऱ्याच वर्षी व्लादमीर यांचा मृत्यू झाला. सांगण्यात येते की, कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती, मात्र, मृत्यूचे खरे कारण फोन नंबर होते.

तीन जणांच्या मृत्यूने निर्माण झालीय दहशत - व्लादमीरनंतर, दिमेत्रोव्ह नावाच्या एका कुख्यात ड्रग डिलरने हानंबर वापरायला सुरुवात केली. हा नंबर घेतल्यानंतर काही काळातच दिमेत्रोव्हचा खून झाला. दिमेत्रोव्हला एका रशियन माफियाने मारले होते. यानंतर हा नंबर बल्गेरियातील एका व्यापाऱ्यानेच घेतला होता. 2005 मध्ये तांचीही हत्या झाली. या तीन मृत्यूंनंतर, हा नंबर कायमचा बंद करण्यात आला. 

टॅग्स :MobileमोबाइलDeathमृत्यू