शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Most Expensive Ice Cream: जगातील सर्वात महागडं आईसक्रिम, किंमत एवढी की ऐकून फुटेल घाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 13:19 IST

Most Expensive Ice Cream: जगात एक असंही आईसक्रीम आहे, जे केवळ अतिश्रीमंत लोकच खरेदी करू शकतात. कारण ते एवढं महाग आहे की, ते खरेदी करण्यासाठी गरीबांना कर्ज घ्यावं लागेल.

सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. तसेच मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आईसक्रिम येण्यास सुरुवात झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आईसक्रिम खायला आवडतं. आईसक्रिमची किंमतही वेगवेगळी असते.  आईसक्रिमची किंमत ही वेगवेगळी असते. काही आईसक्रिम हे ५ रुपयांना मिळतात. तर काहींची किंमत ही ५०० रुपयांपर्यंत असते. प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे आईसक्रिम खातो. मात्र जगात एक असंही आईसक्रीम आहे, जे केवळ अतिश्रीमंत लोकच खरेदी करू शकतात. कारण ते एवढं महाग आहे की, ते खरेदी करण्यासाठी गरीबांना कर्ज घ्यावं लागेल. या आईसक्रिमची किंमत एवढी आहे की त्याच्या किमतीत एखादी चांगली कार खरेदी करता येऊ शकेल.

गेल्या २५ एप्रिल रोजी एका आईसक्रिमने जगातील सर्वात महागडे आईसक्रिम असल्याचा विक्रम नोंदवला आहे. जपानमधील आईसक्रिम निर्माता कंपनी सिलाटो हिने ब्याकुया नावाचं हे आईसक्रिम लाँच केलं आहे. हे प्रोटिनयुक्त आईसक्रिम जगातील सर्वात महागडं आईसक्रिम बनलं आहे. या आईसक्रिमचा वेलवेटी बेस दुधापासून बनवलेला असको. तसेच त्यात दोन प्रकारचे चीज, अंड्याच्या पिवळ्या भागाचाही समावेश असतो. त्याशिवाय पॅर्मियानो चीज, व्हाइट ट्रुफल ऑईल आदी वस्तूंचाही समावेश असतो. हे आईसक्रिम स्टायलिश ब्लॅकबॉक्समध्ये उपलब्ध असते. त्यासोबत हाताने बनवलेला एक धातूचा चमचासुद्धा दिला जातो. हा चमचा क्टोटो येथील काही क्राफ्टमन बनवतात.

या खास वैशिष्ट्ये असलेल्या आइसक्रिमची किंमतही तेवढीच जास्त आहे. कंपनीच्या वेबसाईटवर १३० मिली ब्याकुया आईसक्रिमची किंमत ही ६७०० डॉलर म्हणजेच ५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. आधी या आईसक्रिमसोबत मिळणारा चमचा महाग असल्याने आईसक्रिमची किंमत अधिक असावी अशा अंदाज वर्तवला जात होता. मात्र तसं नाही आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने चमच्याची किंमत न मोजताच या आईसक्रिमची किंमत सांगितली आहे. हे आईसक्रिम व्हाईट वाईनसोबत खाण्यामध्ये अधिक स्वादिष्ट लागते, असा दावाही कंपनीने केला आहे.  

टॅग्स :foodअन्नJara hatkeजरा हटके