शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 20:50 IST

...येथे कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव तर टाकला जातोच, शिवाय त्यांना किरकोळ कारणांमुळे नोकरीवरूनही काढून टाकले जाते. कधी कधी व्यवस्थापकांची वागणूक एवढी खराब असते की, कर्मचारी ते सहन करू शकत नाहीत.

जगातील सर्वात वाईट वर्क कल्चरसंदर्भात जेव्हा-जेव्हा बोलले जाते. तेव्हा-तेव्हा चीनचे नाव सर्वात पहिले समोर येते. येथे कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव तर टाकला जातोच, शिवाय त्यांना किरकोळ कारणांमुळे नोकरीवरूनही काढून टाकले जाते. कधी कधी व्यवस्थापकांची वागणूक एवढी खराब असते की, कर्मचारी ते सहन करू शकत नाहीत.

चीनमधून नुकतेच एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्याने लोकांना चकित करून टाकले आहे. ऑफीसमध्ये थोडी डुलकी घेतल्याने एका कर्मचाऱ्याला थेट नोकरीवरूनच काढून टाकण्यात आले. यानंतर कर्मचाऱ्याने कंपनीला असा धडा शिकवला की, 40 लाख रुपये एवढी भरपाई द्यावी लागली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोक प्रतिक्रियाही देत आहेत.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ही घटना चीनमधील जिआंगसू प्रांतातील आहे. यथे एका झांग नावाच्या व्यक्तीने डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मॅनेजर म्हणून आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत उत्कृष्ट सेवा दिली. मात्र, याच वर्षाच्या सुरुवातीला एका मध्यरात्रीच्या सुमारास झांग स्टोअरच्या कॅमेऱ्यात डुलकी घेताना आढळून आले. यानंतर एचआरने 'अनुशासनहीनते'चे कारण देत त्यांना नोकरीवरून काढून टाकले.

झांग यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला -यानंतर, झांग यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने झांग यांच्या बाजूने निकाल दिला आणि 'कामा दरम्यान झोपणे ही पहिलीच चूक आहे. यामुळे कंपनीचे काही फार मोठे नुकसान झाले नाही. 20 वर्षांच्या निष्ठेच्या सेवेनंतर अशा प्रकारे काढून टाकणे चुकीचे आहे," असे म्हटले आहे.

कंपनीला द्यावी लागली भरपाई -न्यायालयाने कंपनीला झांग यांना 40 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर झांग यांची ही सोटी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. लोक कंपनीच्या हेतूवर टीका करत आहेत आणि झांग यांच्या निर्धाराचे कौतुक करत आहेत.

टॅग्स :chinaचीनjobनोकरीEmployeeकर्मचारीCourtन्यायालय