शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

इथे पिकवला जातो जगातला सर्वात चांगला पिस्ता, चोरी टाळण्यासाठी पोलिसांचा असतो बंदोबस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 17:04 IST

pistachios : चला मग जाणून घेऊ सर्वात चांगल्या पिस्त्याचं आणि महागड्या पिस्त्याचं उत्पादन कुठे घेतलं जातं. इटलीच्या एटना पर्वताजवळ ब्रोटे हा परिसर आपल्या सुंदरतेसाठी ओळखला जातो.

pistachios : पिस्ता तर तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. पण जगातल्या सर्वात चांगल्या पिस्त्याचं उत्पादन कुठे घेतलं जातं हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना! चला मग जाणून घेऊ सर्वात चांगल्या पिस्त्याचं आणि महागड्या पिस्त्याचं उत्पादन कुठे घेतलं जातं. इटलीच्या एटना पर्वताजवळ ब्रोटे हा परिसर आपल्या सुंदरतेसाठी ओळखला जातो. पण या ठिकाणाची खासियत फार कमी लोकांना माहीत आहे. 

सिसली द्वीपाच्या कुशीत वसलेल्या ब्रोटेमध्ये जगातला सर्वात चांगला आणि सर्वात महाग पिस्त्याचं उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे इथे पिस्त्याची चोरी होण्याची सतत भीती असते. अशात पिस्ता सुरक्षेसाठी राष्ट्रीय पोलीस दलातील जवानांना इथे तैनात करण्यात आलं आहे. ग्रीन गोल्ड नावाने प्रसिद्ध

कॅप्टन निकोलो मोरांडीसोबत ५ ऑफिसर इथे सुरक्षेसाठी तैनात असतात. हे लोक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सकाळापासून ते रात्रीपर्यंत पिस्त्याची रखवाली करतात. कॅप्टन मोरांडी यांच्यानुसार, जर गरज पडली तर हेलिकॉप्टरनेही लक्ष ठेवलं जाईल. ते असेही म्हणाले की, पिस्ता सुरक्षेसाठी वेगवेगळ्या सुरक्षा व्यवस्था ठेवल्या जातील. 

मोरोंडी यांच्यानुसार, पिस्त्याचं पिक सप्टेंबरपर्यंत तयार होईल. त्यामुळे ऑपरेशन आताच सुरू करणं लोकांना विचित्र वाटत आहे. पण टीमला यासाठी तयार करणे गरजेचं होतं. कारण ज्या लोकांची या बागांवर नजर आहे, ते आतापासूनच सक्रिय झाले आहेत. 

स्थानिक व्यापार संघटनेचे प्रमुख सिम्बली यांच्यानुसार, या परिसरात २३० अधिकृत शेतकरी आहेत, हेच लोक पिस्त्याची लागवड, तोडणी आणि बाहेर पाठवण्याचं काम बघतात. या पिस्त्याचा रंग आणि चव फार चांगली असल्याने तोडणीवेळीच याची चोरी होण्याची शक्यता अधिक असते. सिसलीमध्ये उत्पादन होत असल्याने हा पिस्ता सिसलीमध्ये ग्रीन गोल्ड म्हणूण ओळखला जातो. या एक किलो पिस्ताची किंमत साधारण ४ हजार रूपये इतकी आहे. तर अमेरिका आणि इराणच्या पिस्त्याला २ हजार ते २५०० रूपये प्रति किलो भाव मिळतो. 

या पिस्त्याला इतकी किंमत असण्याचं कारण म्हणजे या पिस्त्याचं वरचं आवरण काढल्यावरही याचा हिरवेपणा पुढेही बराच काळ टिकून राहतो. जर बाकीच्या पिस्त्यांचं रंग हलका होतो. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स