शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! एकाच घरात ८ बायकांसोबत राहतो हा पती, कुणाची कुठे भेट झाली वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 18:26 IST

Thailand Man 8 Wives : ऑन्ग डॅम सोरोट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. तो एक टॅटू आर्टिस्ट आहे. त्याच्या ८ बायका आहेत आणि त्या सगळ्यजणी एकाच घरात एकत्र राहतात.

हिंदीत एक म्हण आहे की, शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए. बऱ्याच लोकांकडून तुम्ही असंही ऐकलं असेल की, ते त्यांच्या एका पत्नीनेच हैराण आहेत. अनेक लोक दोन लग्न करतात. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याला १ किंवा २ नाही तर ८ बायका (Thailand Man 8 Wives) आहेत. थायलॅंडच्या या व्यक्तीने ८ लग्ने केली आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या सर्व बायका एका छताखाली एकत्र राहतात.

थायलॅंडमध्ये (Thailand) राहणारा ऑन्ग डॅम सोरोट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. तो एक टॅटू आर्टिस्ट आहे. त्याच्या ८ बायका आहेत आणि त्या सगळ्यजणी एकाच घरात एकत्र राहतात. आता इतक्या बायका एकत्र राहणार म्हटल्यावर कुणालाही वाटेल की, त्या भांडत असतील. पण असं अजिबात नाहीये. या ८ एकमेकींच्या सवती फारच प्रेमाने राहतात. इतकंच नाही तर त्या सर्वांचं  ऑन्गवर खूप प्रेम आहे आणि त्या त्याला जगातला सर्वात सज्जन व्यक्ती मानतात.

कशी झाली ८ बायकांसोबत भेट

ऑन्गसंबंधी मजेदार बाब  म्हणजे तो कशाप्रकारे आपल्या पत्नींना भेटला. प्रत्येकवेळी त्याला पहिल्या नजरेत प्रेम झालं आणि त्यांची भेटण्याची जागाही विचित्र आहे. पहिली पत्नी नॉन्ग स्प्राइटला ऑन्ग त्याच्या एका  मित्राच्या लग्नात भेटला होता. पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला होता आणि दोघांनी लग्न केलं. 

नॉन्ग एल ऑन्गची दुसरी पत्नी आहे. तिच्यासोबत त्याची भेट बाजारात झाली होती. तिसरी पत्नी नॉन्ग नॅनसोबत त्याची भेट हॉस्पिटलमध्ये झाली होती. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या पत्नीसोबत त्याची भेट इन्स्टाग्राम, फेसबुक आणि टिकटॉकवर झाली होती. एकदा ऑन्ग त्याच्या आईसोबत एका प्रसिद्ध मंदिरात गेला होता. तिथे त्याची भेट त्याच्या सातव्या पत्नीसोबत झाली होती. आणि आठवी नॉन्ग माईला सोबत तो सुट्टीदरम्यान भेटला होता. तिथे त्याच्या इतर बायकाही त्याच्यासोबत होत्या.

काय करतात त्याच्या बायका

त्याच्या आठही बायका म्हणाल्या की, ऑन्ग त्या सर्वांवर एकसमान प्रेम करतो आणि त्यांची फार काळजी घेतो. त्यांच्या कधीची काही भांडण होत नाही. सोशल मीडियावर लोकांना वाटतं की, ऑन्ग फार पैसेवाला आहे त्यामुळे त्याने इतकी लग्ने केली. पण हे सत्य नाही. 

त्याच्या सर्व बायका छोटा-मोठा बिझनेस करून पैसे कमावतात. ऑन्गने त्याच्या पत्नींना स्पष्ट सांगितलं आहे की, त्यांनी त्याच्यापासून काही लपवू नये. जर त्या दुसऱ्या पुरूषाच्या प्रेमात पडल्या तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं. इतकंच नाही तर जर त्यांना घटस्फोट हवा असेल तरीही स्पष्टपणे सांगावं. तरूणींच्या परिवारांना इतक्या बायका असलेल्या पुरूषासोबत त्यांच्या मुलीने लग्न करण्याला सुरूवातीला विरोध होता. पण ते ऑन्गला भेटले आणि ते त्याच्या स्वभावाच्या प्रेमात पडले. त्यामुळे त्यांचा वेगळे होण्याचा प्रश्नच येत नाही. 

टॅग्स :ThailandथायलंडJara hatkeजरा हटके