शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
2
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
3
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
4
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
5
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
6
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
7
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
8
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
9
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
10
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
11
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
12
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
13
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
14
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
15
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
16
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
17
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
18
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
19
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 17:22 IST

३ मीटर उंच असलेल्या या मूर्तीच्या शरीराचा जवळपास ४० टक्के भाग शुद्ध सोन्याचा आहे. ही मूर्ती १३ ते १५ व्या शतकात सुखोथाई काळात बनवण्यात आली होती

जगातील सर्वात मोठी सॉलिड गोल्ड बुद्धाची प्रतिमा कायम सोशल मीडियावर नजरेस पडते. ही मूर्ती कुठल्या देशात आहे, हे माहिती आहे का? याला गोल्डन बुद्ध म्हणतात, जी थायलंडमध्ये आहे. ३ मीटर उंच आणि ५५०० किलो सोन्याने बनलेली ही मूर्ती आहे. या मूर्तीच्या विविध हिस्स्यात सोन्याची शुद्धता वेगवेगळी आहे. केस आणि डोक्याकडील भाग ९९ टक्के शुद्ध सोन्याने बनलेला आहे. थायलंडची सुवर्ण बुद्ध मूर्ती किती जुनी आहे, तिचे रहस्य कसे उघड झाले आणि तिचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया

३ मीटर उंच असलेल्या या मूर्तीच्या शरीराचा जवळपास ४० टक्के भाग शुद्ध सोन्याचा आहे. ही मूर्ती १३ ते १५ व्या शतकात सुखोथाई काळात बनवण्यात आली होती. बर्मा आक्रमणच्या वेळी ही मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला प्लास्टरने झाकण्यात आले होते, जेणेकरून ही मूर्ती इतर सामान्य मूर्तीसारखी वाटेल आणि आक्रमणकर्त्यांकडून तिचा बचाव होईल. १९५५ साली या मूर्तीचे रहस्य उलगडले आणि संपूर्ण जग हैराण झाले. सुखोथाई साम्राज्याच्या काळात बौद्ध कला सुवर्ण युगात होती असा दावा केला जातो. म्हणून ही मूर्ती पूर्णपणे सोन्याने कोरली गेली होती. वर्षानुवर्षे, ती मातीची बुद्ध मूर्ती मानली जात होती आणि वारसा म्हणून जतन केली जात होती. १९५५ मध्ये, ती बँकॉकमधील वाट ट्रायमिट मंदिरात हलविण्याची योजना आखण्यात आली होती, परंतु एका चुकीमुळे त्या मूर्तीची खरी ओळख उघड झाली.

'असं' उलगडलं रहस्य

१९५५ मध्ये जेव्हा ही मूर्ती नवीन मंदिरात नेली जात होती, तेव्हा मूर्तीचा एक भाग चुकून तुटला, ज्यामुळे त्यातील सोन्याची मूर्ती बाहेर दिसली. तेव्हा जगासमोर तिची खरी ओळख उलगडली. या मूर्तीत भगवान बुद्ध ध्यानस्थ अवस्थेत असल्याचे दिसून येते. बुद्धांचा चेहरा शांत दिसतो, त्यांचे डोळे खाली पाहत असलेले असतात आणि चेहऱ्यावर हलकेसे स्मित असते. त्यांच्या केसांमधील सोनेरी कुरळे आणि कपाळावरील रत्नासारखे तेज ज्ञान, करुणा आणि आंतरिक शांतीचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. दरवर्षी जगभरातून लाखो लोक बुद्धांच्या ध्यानस्थ मुद्रा पाहण्यासाठी थायलंडला भेट देतात. सुवर्ण बुद्ध मूर्ती थायलंडचा धार्मिक खजिना मानली जाते. ही थायलंडच्या समृद्ध संस्कृतीचे आणि बौद्ध धर्मावरील भक्तीचे प्रतीक बनली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने जगातील सर्वात मोठी घन सोन्याची बुद्ध मूर्ती म्हणून याला मान्यता दिली आहे. सोने भगवान बुद्धांच्या पवित्र ज्ञानाचे, शांतीचे आणि अमरत्वाचे प्रतीक मानले जाते.

या मूर्तीचे महत्त्व अफाट आहे. ते थायलंडच्या सांस्कृतिक वारशाचे आणि कलात्मक उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. ही मूर्ती हजारो पर्यटकांना आकर्षित करते जी त्यांची सुवर्ण झळाळी पाहण्यासाठी आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेण्यासाठी येतात. या मूर्तीच्या दडलेल्या रहस्याची आणि आकस्मिक शोधाची कहाणी पर्यटकांना आश्चर्यचकित करते, जी थायलंडच्या इतिहासाची कहाणी उलगडते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Golden Buddha's 5500 kg Secret: Accident Unveiled Decades-Hidden Statue

Web Summary : Thailand's massive golden Buddha statue, hidden under plaster for centuries, was accidentally revealed in 1955. Weighing 5500 kg, the Sukhothai-era statue is a symbol of Thai culture and Buddhist devotion, attracting visitors worldwide. Its discovery unveiled a rich history.
टॅग्स :Thailandथायलंड