शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन प्रोफेसरचा अजब खळबळजनक दावा, मनुष्यांच्या वेशात पृथ्वीवर राहतात एलियन्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 13:14 IST

डॉक्टर  डेविड जॅकब्स पेंसिलवेनियाच्या टेंपल यूनिव्हर्सिटीमध्ये इतिहासाचे प्रोफेसर आहे आणि ते यूफोलॉजीचे तज्ज्ञ आहेत.

मनुष्यांना दुसऱ्या ग्रहांबाबत आणि तिथे काय आहे हे  जाणून घेण्यााबाबत नेहमीच उत्सुकता असते. वेगवेगळ्या ग्रहांबाबत सतत काहीना काही रिसर्च सुरू असतात. अशात अमेरिकन प्रोफेसर डॉक्टर डेविड जॅकब्स (Dr David Jacobs) यांनी एक अजब दावा केला आहे. ते म्हणाले की, एलियन्स (Aliens) मनुष्यांचं अपहरण करत आहेत आणि स्वत: पृथ्वीवर येत आहेत. या खळबळजनक दाव्याच्या समर्थनात त्यांनी अनेक तर्कही दिले आहेत.

डॉक्टर  डेविड जॅकब्स पेंसिलवेनियाच्या टेंपल यूनिव्हर्सिटीमध्ये इतिहासाचे प्रोफेसर आहे आणि ते यूफोलॉजीचे तज्ज्ञ आहेत. डेविड यांनी दावा केला आहे की, त्यांनी अशा अनेक लोकांशी संवाद साधला ज्यांचं एलियन्सने अपहरण केलं होतं आणि ते वाचले. यासंबंधी एक डॉक्युमेंट्री Extraordinary: The Revelations या नावाने त्यांनी तयार केली. यात किती सत्य आणि किती भ्रम आहे हे आम्ही सांगू शकत नाही, पण त्यांचे दावे घाबरवणारे आहेत.

Daily Star च्या रिपोर्टनुसार, डेविड जॅकब्स यांचा दावा आहे की, एलियन्स पृथ्वीवर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. पण त्याआधी ते मनुष्यांचं अपहरण करून त्यांचा माइंड कंट्रोल करत आहेत. त्यांच्यानुसार, मनुष्यांनी अनेक ठिकाणांवर आपला कब्जा  केला आहे आणि आता एलियन्सना सुद्धा तेच करायचं आहे. त्यांनी दावा केला की, ते अशा अनेक लोकांसोबत बोलले ज्यांचं एलियन्सने अपहरण केलं होतं आणि एलियन्स त्यांना म्हणाले की, ते त्यांच्याकडून भविष्यात काम करून घेतील. अशा अनेक लोकांना सांगण्यात आलं की, त्यांना क्राउड कंट्रोल इन्स्ट्रक्शन दिले जाऊ शकतात.

डेविड जॅकब्स यांचा अजब दाव्यांपैकी एक असाही दावा आहे की, काही एलियन्स मनुष्यांसारखे दिसतात आणि ते पृथ्वीवर आले आहेत. ही माहितीही त्यांनी एलियन्सकडून अपहरण करण्यात आलेल्या लोकांच्या आधारावर दिली आहे. एका व्यक्तीने सांगितलं की, ते मनुष्यांसारखे दिसतात आणि ते शिकतात की, मनुष्यांमध्ये कसं रहायचं. ते सुपरह्यूमन आहेत आणि त्यांना आपल्याला कंट्रोल करायचं आहे. ते मनुष्यांचा मेंदू सहजपणे नियंत्रित करू शकतात. डेविड जॅकब्स यांनी ही सगळी माहिती BLAZE च्या UFO WEEK मध्ये येऊन सांगितली. 

टॅग्स :AmericaअमेरिकाResearchसंशोधनJara hatkeजरा हटके