शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! ...म्हणून 'त्याने' आपल्या हातावरच काढला बारकोडचा टॅटू; कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 11:39 IST

तुम्ही कधी बारकोड टॅटू पाहिला आहे का? तुम्हाला हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, कारण प्रत्यक्षात बारकोड हा उत्पादन किंवा किंमत स्कॅन करण्यासाठी असतो.

टॅटू काढायला अनेकांना आवडतं. सध्या हटके, भन्नाट टॅटूची क्रेझ पाहायला मिळते. काही लोक त्यांच्यासाठी सर्वात जास्त अर्थ असलेल्या गोष्टींकडे खूप आकर्षित होतात, मग ते एखादं चित्र, लोगो किंवा छानसं वाक्य असो. त्याचाच टॅटू काढतात. पण तुम्ही कधी बारकोड टॅटू पाहिला आहे का? तुम्हाला हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल, कारण प्रत्यक्षात बारकोड हा उत्पादन किंवा किंमत स्कॅन करण्यासाठी असतो. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर बारकोड टॅटू बनवण्याची बाब आश्चर्यकारक आहे. पण अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. 

स्मार्टफोनचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे, कॅश पेमेंट आता ट्रेंडच्या बाहेर आहे. लोक रोख रक्कम देण्याऐवजी ऑनलाईन पेमेंट करण्यास प्राधान्य देतात. बहुतेक लोक कार्ड किंवा ट्रान्झॅक्शन अ‍ॅप्सद्वारे पैसे देतात, ज्यांना सामान्यतः भारतात UPI पेमेंट म्हणून ओळखले जाते. तुम्ही तुमच्या फोनवर कोड स्कॅन करा आणि अ‍ॅपद्वारे पैसे द्या. पण एका घटनेने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. तैवानमधील एका व्यक्तीने असा धक्कादायक प्रकार केला, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. 

ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आपल्या हातावर बारकोड टॅटू केला आहे. कारण ही व्यक्ती खूप आळशी असून प्रत्येक वेळी फोन काढण्यास कंटाळा येतो. म्हणून यापासून सुटका करून घेण्यासाठी त्याने हा टॅटू एकदाच कायमचा काढून घेतला आहे. तैवानमध्य़े ही घटना घडली आहे. ही व्यक्ती प्रत्येक वेळी एखादी गोष्ट घेतल्यानंतर पैसे देण्यासाठी आपला फोन काढून थकली होती, त्यामुळे त्याने एक विचित्र उपाय शोधून काढला. 

व्यक्तीने आपल्या हातावर पेमेंट बारकोडचा टॅटू काढला आहे आणि आता जेव्हा जेव्हा त्याला पेमेंट करायचे असते तेव्हा तो फक्त हात दाखवतो. या व्यक्तीची ओळख उघड करण्यात आली नाही, मात्र आता तो तैवानमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल झाला आहे. टॅटू बनवण्याचा खूप दिवसांपासून विचार करत होता. तेव्हाच ही अनोखी कल्पना सुचली असं त्याने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल