शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

आयफोन, हेलिकॉप्टर, कार, रोबोट देणार; चंद्रावरही नेणार; अपक्ष उमेदवाराचा जाहीरनामा पाहून मतदार 'उडाले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 15:42 IST

Tamil Nadu Assembly Election 2021: अपक्ष आमदाराकडून आश्वासनांची खैरात; प्रत्येक घरातील तरुणाला एक कोटी मिळणार

चेन्नई: तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीचा (Tamil Nadu Assembly Election 2021) धुरळा उडाला आहे. ६ एप्रिलपासून राज्यात मतदानाला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यांना विविध आश्वासनं देत आहेत. मात्र एका अपक्ष आमदाराच्या जाहीरनाम्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याला म्हणतात नशीब! फक्त १६३ रूपयांचं जेवण घेऊन ती घरी आली; अन् मिळाला १ कोटीचा मोतीदक्षिण मदुराई मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ३४ वर्षीय सरावनान यांनी मतदारांना अनेक आश्वासनं दिली आहेत. सरावनान यांनी दिलेली एकापेक्षा एक भन्नाट आश्वासनं पाहून मतदारदेखील 'उडाले' आहेत. निवडून आल्यास आयफोन, कार, हेलिकॉप्टर, रोबोट आणि बरंच काही देऊन अशी आश्वासनं त्यांनी दिली आहेत. त्यामुळे सरावनान यांचा जाहीरनामा सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.असाही आजार! आकर्षक पुरूष दिसला की लगेच डगमगते ही महिला, रस्त्याने खाली मान घालून चालणं भाग!मी निवडून आल्यास प्रत्येक घरामागे एक आयफोन, कार, हेलिकॉप्टर, रोबोट देईन. मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला स्विमिंग पूलसह तीन मजली घर, तरुणांना एक कोटी रुपये देईन. याशिवाय चंद्रांवर १०० दिवस सहलीला घेऊन जाईन, अशी आश्वासनं सरावनान यांनी दिली आहेत. मतदारांसोबतच मतदारसंघासाठीही त्यांनी मोठमोठी आश्वासनं दिली आहेत. मतदारसंघात अंतराळ संशोधन केंद्र, रॉकेट लॉन्चिंग साईट आणि ३०० फुटांचा कृत्रिम हिमनग उभारण्यात येईल, अशी घोषणादेखील सरावनान यांनी केली.  लोकांच्या मनात जागरुकता निर्माण व्हावी, तरुणांचा राजकारणातील सहभाग वाढावा यासाठी निवडणूक लढवत असल्याचं सरावनान यांनी सांगितलं. निवडणूक कशी लढवायची असते याची अनेकांना कल्पना नसते. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठीच मी निवडणूक लढवत आहे, अशा शब्दांत सरावनान यांनी त्यांचा उद्देश सांगितला. निवडणूक, मतदान याबद्दल जनजागृती झाल्यास त्याचा लाभ समाजाला होईल. राजकीय नेत्यांवर लोकांचा वचक राहील, असं सरावनान म्हणाले.

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१