शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

तब्बल १४० वर्षाआधी बुडालेल्या जहाजाचं सत्य आलं समोर, एका तुटलेल्या प्लेटनं उलगडलं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:01 IST

Horrifying Secret: अलिकडेच १४० वर्षाआधी बुडालेल्या SS Nantes या ब्रिटीश जहाजाचा शोध लावण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल इतक्या वर्षांनंतर हे जहाज केवळ एका तुटलेल्या प्लेटच्या मदतीनं शोधण्यात आलं.

Horrifying Secret: समुद्रात बुडालेल्या जहाजांची कहाणी नेहमीच लोकांसाठी उत्सुकता वाढवणारा विषय असतो. जहाज कसं बुडालं, कसं सापडलं आणि त्यात काय होतं हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता असते. पूर्वी नेहमीच समुद्री वादळांमुळे आणि अपघातांमुळे जहाज बुडत होते. आजकाल जहाज बुडण्याच्या घटना कमी होतात. अलिकडेच १४० वर्षाआधी बुडालेल्या SS Nantes या ब्रिटीश जहाजाचा शोध लावण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल इतक्या वर्षांनंतर हे जहाज केवळ एका तुटलेल्या प्लेटच्या मदतीनं शोधण्यात आलं.

SS Nantes नावाचं हे जहाज १८८८ मध्ये बुडालं होतं. जर्मन जहाज Theodore Ruger सोबत या जहाजाची टक्कर झाली होती. हे जहाज लिव्हरपूलहून कोळसा घेऊन Le Havre ला जात होतं. टक्कर इतकी जोरात होती की, जहाजातील लाइफबोट्स तुटल्या आणि क्रू मेंबर्सकडे पाण्यात उड्या मारण्याशिवाय पर्याय राहिला नाही. काही तासच जहाज पाण्यावर तरंगलं. पण छिद्रातून पाणी आत शिरत होतं. या अपघातात २३ लोकांचा जीव गेला होता आणि केवळ ३ लोकांचा जीव वाचला होता.

SS Nantes ला 1874 मध्ये Cunard Steamship Company बनवलं होतं. त्याकाळी चांगले नॅवेगेशन उपकरणं नसल्यानं तेव्हा या जहाजाचा मलबा शोधता आला नाही. फक्त काही तुकडे आणि मृततेह कॉर्नवालच्या किनाऱ्यावर सापडले होते. पण जहाजाचा आतापर्यंत काही पत्ता लागला नव्हता.

तुटलेल्या प्लेटनं सापडलं जहाज

2024 मध्ये डॉमिनिर रॉबिन्सन नावाचे माजी सैनिक आणि अनुभवी डायव्हर यांनी हा मलबा शोधला. रॉबिन्सन यांना एक तुटलेली प्लेट सापडली होती. ज्यावर Cunard Steamship Company चा लोगो होता. ही तुटलेली प्लेटच नंतर मोठा पुरावा बनली.

 रॉबिन्सन म्हणाले की, "लोकांनी आधीही या ठिकाणी जहाजाचा शोध घेतला. पण त्यांना हे माहीत नव्हतं की, हेच ते जहाज आहे. केवळ एका प्लेटनं सगळं रहस्य उलगडलं". प्लायमाउथ यूनिव्हर्सिटीचे डॉ. हॅरी बेनेट यांनी हा शोध ऐतिहासिक असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, "हे तर समुद्रात सुई शोधण्यासारखं आहे. स्थानिक डायव्हरनी कमाल काम केलं आहे".

या मलब्याशी संबंधित व्हिडीओ आणि पुराव्यांवरून हे स्पष्ट झालं आहे की, हे SS Nantes जहाजच आहे. या शोधामुळे जुने समुद्री रहस्य समोर आले आणि त्या २३ लोकांची आठवण ताजी केली. ज्यांनी यात जीव गमावला होता. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके