शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! प्रेमात इतका आंधळा झाला ट्रेन ड्रायव्हर, कंट्रोल रूममध्ये गर्लफ्रेन्डला बोलवलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 18:01 IST

हे सगळं तेव्हा घडलं जेव्हा ट्रेन प्रवाशांनी भरलेली होती. प्रेमात हरवलेल्या हॅरिस आणि त्याच्या गर्लफ्रेन्डने कंट्रोल रूममध्ये काही फोटो काढले.

प्रेमात कुणी किती वेडं होऊ शकतं याचा अंदाज लावणं जरा अवघड आहे. पण प्रेमात पडल्यावर काही लोक अशा काही चुका करतात ज्याचा भुर्दंड त्यांना आयुष्यभर भोगावा लागतो. न्यूयॉर्क शहरात असाच एका माथेफिरू आशिक सापडला जो व्यवसायाने ट्रेन ड्रायव्हर आहे. हा प्रियकराने आपल्या गर्लफ्रेन्डच्या प्रेमात असं काही केलं की, त्याला तुरूंगाची हवा खावी लागू शकते.

धोक्यात घातला प्रवाशांचा जीव

डेली मेलच्या वृत्तानुसार, ३२ वर्षीय टेरेल हॅरिस शहरात चालणाऱ्या सब वे ट्रेनमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी करतो. पण प्रेमाच्या नादात त्याने असं काही केलं ज्याबाबत वाचल्यावर सगळेच हैराण झाले. त्याने त्याची गर्लफ्रेन्ड डॉमिनिकला डेटसाठी ट्रेनमध्ये बोलवलं. इतकंच नाही तर त्याने कंट्रोलमध्ये गर्लफ्रेन्डला बोलवून तिच्या हाती ट्रेनचा कंट्रोल दिला. (हे पण वाचा : प्रेमासाठी कायपण! गर्लफ्रेन्डला इंग्रजीत फेल होण्याची होती भीती, बॉयफ्रेन्ड मुलगी बनून तिचा पेपर द्यायला गेला आणि....)

हे सगळं तेव्हा घडलं जेव्हा ट्रेन प्रवाशांनी भरलेली होती. प्रेमात हरवलेल्या हॅरिस आणि त्याच्या गर्लफ्रेन्डने कंट्रोल रूममध्ये काही फोटो काढले. गर्लफ्रेन्डने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, 'मी आता ट्रेन चालवत आहे'. फोटोत स्पष्टपणे बघू शकता की, डॉमिनिकच्या हाती ट्रेनचा लिवर आहे. 

गेली नोकरी...

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने यावरून वाद पेटला आहे. यानंतर टेरेल हॅरिसला लगेच नोकरीवरून काढण्यात आलं आणि या प्रकरणाची  चौकशी न्यूयॉर्क पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे. टेरेलवर आरोप आहे की, त्याने अनेक स्टॉपर्यंत ट्रेनचा कंट्रोल त्याच्या गर्लफ्रेन्डच्या हाती दिला होता. सोबतच शेकडो लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचं काम केलं. (हे पण वाचा : टॉयलेटमध्ये इंटिमेट झालेल्या कपलचा व्हिडीओ रेकॉर्ड होता तरूण आणि मग झालं असं काही...)

टेरेलच्या गर्लफ्रेन्डने तिच्या या व्हिडीओत सांगतिलं की, तिने एका स्टेशनहून दुसऱ्या स्टेशनला पोहोचल्यावर कंट्रोल पुन्हा बॉयफ्रेन्डच्या हाती दिला. नंतर ती प्रवाशांच्या सीटवर जाऊन बसली. टेरेल हा गेल्या १० वर्षापासून ड्रायव्हरची नोकरी करत होता. पण आता त्याला कंट्रोल रूममध्ये शिरण्याचीही परवानगी नाही. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही.  

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके