शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी फोन उचलला; महिला झाली कोट्यधीश, ऑस्ट्रेलियातील सुखद घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 08:34 IST

ऑस्ट्रेलियातील महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून सतत फोन येत होते व ती ते घेण्याचे टाळत होती. सरतेशेवटी तिने तो फोन घेतला व तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून सतत फोन येत होते व ती ते घेण्याचे टाळत होती. सरतेशेवटी तिने तो फोन घेतला व तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या महिलेला ११ कोटी रुपयांचे लॉटरीचे बक्षीस लागले होते व ते सांगण्यासाठी तो दूरध्वनी सतत घणघणत होता.या महिलेने वेस्टबरी फेस्टिवलमध्ये एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. तीच लॉटरी तिला लागली होती. ही बातमी अनोळखी क्रमांकावरून समजताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.  अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी करून फसवणूक केली जाण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. त्यामुळे अशा दूरध्वनींची सर्वांनीच धास्ती घेतलेली असते. ऑस्ट्रेलियातील टास्मानियामध्ये राहणाऱ्या या महिलेने सांगितले की, अनोळखी क्रमांकावरून आलेले दूरध्वनी मी कधीच उचलत नाही. कारण अशा दूरध्वनींद्वारे लोकांना विविध आमिषे दाखविली जातात. 

विश्वास बसला नाहीलॉटरीचे बक्षीस मिळालेली महिला म्हणाली की, सातत्याने अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या दूरध्वनींमुळे माझी चिडचिड होत होती. एकदा काय तो सोक्षमोक्ष लावावा म्हणून मी अखेर तो फोन उचलला व मला धक्काच बसला. लॉटरीचे तिकीट लागल्याचे समजल्यानंतर मला काही क्षण विश्वास बसेना. पण, ते सत्य होते!

टॅग्स :Jara hatkeजरा हटके