शहरं
Join us  
Trending Stories
1
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
2
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
3
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
4
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
5
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
6
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
7
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
8
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
9
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
10
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
11
"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 
12
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
13
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
14
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
15
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

आपल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कपल दोन महिन्यांचं बाळ सोबत घेऊन आले अन् पाहुणे हैराण झाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 10:06 AM

ही घटना पाकिस्तानातील हफीजाबादमधील आहे. जे लोक या रिसेप्शनमद्ये सहभागी झाले होते ते सगळेच हैराण झाले. हे रिसेप्शन २३ मार्चला पार पडलं.

लग्न किंवा रिसेप्शनमधील अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एक घटना पाकिस्तानातून समोर आली आहे. इथे एक कपल त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये त्यांचं दोन महिन्यांचं बाळ घेऊन पोहोचल आणि एकच चर्चा रंगली. दोघांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना पाकिस्तानातील हफीजाबादमधील आहे. जे लोक या रिसेप्शनमद्ये सहभागी झाले होते ते सगळेच हैराण झाले. हे रिसेप्शन २३ मार्चला पार पडलं.

आपल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कपल दोन महिन्यांचं बाळ घेऊन पोहोचलं. त्यानंतर यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या लग्नाबाबत लोक अंदाज लावत आहेत की, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हे बाळ त्यांच्यासोबत कसं? काही लोक म्हणाले की, हे प्रकरण समजण्यापलिकडचं आहे तर काही म्हणाले हे विचित्र प्रकरण आहे. (हे पण वाचा : कमालच झाली! स्वीमिंगसाठी गेलेली महिला अचानक झाली गायब, २० दिवसांनी नग्नावस्थेत ड्रेनेजमधून तिला काढलं!)

काय आहे नेमकं प्रकरण?

बीबीसीने याबाबत कपलसोबत संवाद साधला आणि हे प्रकरण विस्तृतपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या कपलने सांगितले की, 'आमचं लग्नाचं रिसेप्शन गेल्यावर्षी १४ मार्च २०२० ला होणार होतं. पण १४ मार्चला लॉकडाउन लागू झाला त्यामुळे रिसेप्शन टाळावं लागलं. (हे पण वाचा : स्लिम कंबर दाखवण्यासाठी अशी दिली पोज, अभिनेत्रीला मागावी लागली माफी!)

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागल्यानंतर परदेशातून आपला देश पाकिस्तानमध्ये परत येणं शक्य नव्हतं. ज्यामुळे त्यांना तिथेच थांबावं लागलं. लॉकडाऊन वाढतच गेला आणि रिसेप्शनही कॅन्सल करावं लागलं.

अशात प्रेग्नेंट झाली पत्नी

परिवारातील लोका रिसेप्शनच्या तारखेबाबत कन्फ्यूज होते. त्यानंतर रमजान आणि नंतर ईद, लॉकडाऊन सुरूच राहिलं. रेयान म्हणाला की, सरकारने सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट देण्यास सुरूवात केली आणि त्यावेळी माझी पत्नी प्रेग्नेंट होती. ज्यामुळे रिसेप्शन करणं शक्य नव्हतं. या वर्षाच्या सुरूवातीला जानेवारी महिन्यात पत्नीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर आम्ही रिसेप्शनचा प्लॅन केला. यासाठी आमचे परिवारही तयार झाले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल