शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र घटना! 32 वर्षीय तरुणाचा गोळी लागून मृत्यू; हत्येचा आरोप त्याच्याच पाळीव कुत्र्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 14:58 IST

तुर्कस्तानच्या सॅमसन प्रांतात एका व्यक्तीची त्याच्याच पाळीव कुत्र्याने गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

तुर्कस्तानच्या सॅमसन प्रांतात एक विचित्र घटना घडली आहे. एका व्यक्तीची त्याच्याच पाळीव कुत्र्याने गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कुत्र्याचा पाय चुकून बंदुकीच्या ट्रिगरवर पडल्याने गोळी सुटली आणि थेट त्या व्यक्तीला लागली. या गटनेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृतक त्याच्या मित्रांसोबत किजलान पठारावर शिकारीला गेला असताना ही विचित्र घटना घडली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कुत्र्याने झाडली गोळीमिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मृत व्यक्तीचे नाव ओझगुर गावरेकोग्लू(32) असे आहे. मृतक त्याच्या मित्रांसोबत किजलान पठारावर शिकारीला गेला होता. यावेळी त्याच्या पाळीव कुत्र्याचा पाय शॉटगनच्या ट्रिगरवर पडला आणि लोडेड शॉटगनमधून गोळी गावरेकोग्लूला लागली. गोळी लागताच तो जागीच कोसळला.

10 दिवसांपूर्वी वडील झालास्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृतक 10 दिवसांपूर्वीच मुलाचा बाप झाला होता. या घटनेनंतर मृत ओऱझगुरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एकामध्ये तो शिकार केलेल्या पक्ष्यांचे मृतदेह हातात धरून उभा दिसत आहे. इतर फोटोंमध्ये तो आपल्या पाळी कुत्र्यांसोबत दिसत आहे. मात्र, कोणत्या कुत्र्याने गोळी झाडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काही तुर्की माध्यमांनी गॅव्रेकोग्लूची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पाळीव कुत्र्याने हत्या केल्याचा बनाव करत असल्याचा आरोप आहे. 2018 मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये अशीच एक घटना घडली होती. सशाची शिकार करताना एका माणसाच्या पाठीत चुकून त्याच्याच पाळीव कुत्र्याने गोळी झाडली होती.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय