शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

डुकराच्या पोटातून मिळाला असा एक दगड ज्याची किंमत आहे कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 17:23 IST

डुकराच्या पोटातून सापडलेल्या या दगडाने त्या खेडूताला अचानक पैसा मिळवून दिला. तो माणूस आता कोटींचा मालक आहे.

ठळक मुद्देकोणाचं नशिब कसं आणि कधी पालटेल हे काही सांगता येणार नाही. चीनच्या खेडेगावातील एका माणसाला सापडलेल्या दगडामुळे तो इसम आता करोडपती बनणार आहे. हा दगड इतर दगडांपेक्षा निराळा दिसत होता. त्यामुळे नक्कीच हा दगड खास असणार.

चीन : कोणाचं नशिब कसं आणि कधी पालटेल हे काही सांगता येणार नाही. चीनच्या एका खेडेगावात एका माणसाला असा एक दगड सापडला आहे ज्यामुळे तो इसम आता करोडपती बनणार आहे. आपल्या गोठ्यात मिळणारा एक साधा वाटणारा दगड आपल्याला करोडपती बनवू शकतो यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही ही बातमी वाचाच.

डेक्कन क्रोनिकल या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या ग्रामीण भागात राहणारे बो चुंलोऊ यांना त्यांच्या गोठ्यात एक दगड सापडला. हा दगड इतर दगडांपेक्षा निराळा दिसत होता. त्यामुळे नक्कीच हा दगड खास असणार असं बो चुंलोऊ यांना वाटलं. आठ वर्षाच्या एका डुक्करीणीची कत्तल केल्यानंतर त्याला हा दगड सापडला. प्राण्यांच्या पोटात हा दगड असतो. हा दगड म्हणजे डुकरांच्या अवयवाचा एक भाग असतो. तसंच औषधी दगड म्हणूनही या दगडाकडे पाहिलं जातं. त्यामुळे या दगडाला बाजारात जास्त किंमत आहे. बो चुंलोऊ यांना हा दगड सापडल्यानंतर त्यांच्या शेजाऱ्यांनी या दगडाविषयी माहिती सांगितली. त्यानुसार त्यांना या दगडाविषयी आणखी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. 

४ इंच लांब आणि २.५ इंच रुंद असलेल्या या दगडावर केसही आढळतात. या दगडाला बेझोर असं म्हणतात. जेव्हा या बेझोरची किंमत बाजारात या इसमाने विचारली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या दगडाची किंमत जवळपास ८.७ कोटी रुपये एवढी आहे असं त्याला कळलं. या दगडाला पिग ट्रेजर म्हणजेच डुक्करांचा खजिना असंही म्हणतात. हा दगड महत्त्वाचा आहे कारण यापासून अनेक औषधं तयार होतात. तुम्ही औषधी वनस्पतींविषयी ऐकलंच असेल. पण बेझोर याला औषधी दगड असं म्हणतात. १६०० च्या काळात इंग्लडमध्ये सर्वप्रथम या दगडाची माहिती झाली होती. त्यानंतर चीनमध्ये अनेक वैद्यांनी या दगडाचा वापर औषधांसाठी  करायला सुरुववात केली. विषबाधेपासून वाचण्याकरता या बेझोरपासून इंजेक्शन बनवलं जातं, सगळ्या विषबाधेवर हे एक उत्कृष्ट औषध आहे असं म्हटलं जातं. 

आणखी वाचा - अजब ! फुलांचं नुकसान केल्याने पोलिसांनी गाढवांनाच केली अटक, चार दिवस कारागृहात ठेवलं डांबून

टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय