शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञांनी असं मोबाइल अॅप विकसित केलं आहे, ज्यामुळे घेता येतो परफेक्ट सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 16:50 IST

संगणक तज्ज्ञांनी एक असं स्मार्टफोन अॅप विकसीत केलं आहे ज्या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला परफेक्ट सेल्फी काढण्याची कला शिकता येणार आहे.

ठळक मुद्दे संगणक तज्ज्ञांनी एक असं स्मार्टफोन अॅप विकसीत केलं आहे ज्या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला परफेक्ट सेल्फी काढण्याची कला शिकता येणार आहे.कोणत्या अँगलमध्ये मोबाईलचा कॅमेरा पकडला की बेस्ट सेल्फी मिळेल हे व्यक्तीला सहज समजेल, अशा प्रकारचं या अॅपचं अल्गोरिथम आहे. कॅनडाच्या वॉटरलू युनिव्हर्सिटीतील संगणक शास्त्रज्ञांनी हे नवं अॅप तयार केलं आहे.

वॉटरलू, दि. 3- सध्या कधीही आणि कुठेही सेल्फी काढायची पद्धतच आहे. पण बरेच सेल्फी काढल्यानंतरही मनासारखा फोटो काढता येत नाही. पण ज्यांना सेल्फी काढायला आवडतं पण परफेक्ट सेल्फी काढला येत नाही, अशा लोकांसाठी आता एक खास मोबाईल अॅप तयार करण्यात आलं आहे. संगणक तज्ज्ञांनी एक असं स्मार्टफोन अॅप विकसीत केलं आहे ज्या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला परफेक्ट सेल्फी काढण्याची कला शिकता येणार आहे. कोणत्या अँगलमध्ये मोबाईलचा कॅमेरा पकडला की बेस्ट सेल्फी मिळेल हे व्यक्तीला सहज समजेल, अशा प्रकारचं या अॅपचं अल्गोरिथम आहे. कॅनडाच्या वॉटरलू युनिव्हर्सिटीतील संगणक शास्त्रज्ञांनी हे नवं अॅप तयार केलं आहे. सेल्फी एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये लोक स्वतःला तसंच स्वतःच्या अनुभवांना व्यक्त करत असतात. फक्त फरक इतकाच की प्रत्येक सेल्फी सारखा नसतो, असं कॅनडाच्या वॉटरलू युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॅन वोगल म्हणाले आहेत. 

इतर अॅप्लिकेशनमध्ये सेल्फी काढल्यानंतर तो नीट करण्याचं फीचर असतं. पण या अॅपमध्ये सिस्टम युजरला सेल्फी कसा चांगला येईल, याबद्दलची दिशा दाखविणार आहे, असंही वोगल यांनी सांगितलं. अॅपचं अल्गोरिदम डेव्हलप करताना वोगल आणि वॉटरलू युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी किफान ली यांनी सामान्य दिसणाऱ्या लोकांचं थ्री डी स्कॅनिंग घेतलं होतं. या दोघांनी शेकडो वर्चुअल स्मार्टफोन कॅमेरा आणि कॉम्युटर लाइटिंगचे कोड लिहून अनेक वर्चुअल सेल्फी काढल्या.याचा उपयोग त्यांना अॅप विकसीत करताना झाला. याच्याच माध्यमातून सेल्फी काढताना चेहरा कसा ठेवावा, लाइटची दिशा कशी असावी, या गोष्टी ठरविण्यात आल्या. 

एका ऑनलाइन क्राउडसोर्सिंग सर्व्हिसचा वापर करून, वोगल आणि किफान ली यांनी हजारो लोकांचं मत नोंदवून घेतलं. आणि त्यांच्या अॅपमधून काढलेल्या फोटो पैकी कोणता वर्चुअल सेल्फी फोटो बेस्ट आहे त्याची माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी मतांच्या आधारे नवं अल्गोरिदम बनवलं ज्यामुळे लोकांना सगळ्यात उत्तम सेल्फी काढता येतील. यानंतर त्यांनी लोकांना त्यांच्या मोबाईलमधील कॅमेऱ्यातून सेल्फी काढालया लावली तसंच अल्गोरिथमच्या कॅमेरा अॅपमधून सेल्फी काढायला लावली. दोन्ही सेल्फी काढल्यानंतर ऑनलाइन रेटिंगमधून नव्या अॅपमधून काढलेल्या सेल्फी 26 टक्क्याने चांगल्या आल्या.इडनबर्गमध्ये झालेल्या डिझायनिंग इंटरॅक्टीव्ह सिस्टमच्या सर्वसाधारण सभेत वोगन आणि किफान ली यांनी त्यांचं काम सादर केलं.