(Image Credit : guiness world records)
सामान्यपणे घोड्याची उंची चार ते पाच फूट असते. घोडा जेवढा जास्त उंच तेवढा सुंदर दिसतो. पण पोलॅंडमध्ये एका असा घोडा आहे, ज्याला जगातला सर्वात लहान घोडा सांगितलं जात आहे. बॉम्बेल नावाच्या या घोड्याची त्याच्या उंचीमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
तुम्हाला वाचून धक्का बसेल की, जगातल्या सर्वात लहान घोड्याची उंची केवळ ५६.७ सेंटीमीटर म्हणजेच एक फूट १० इंच इतकी आहे. ही एका सामान्य लांबीच्या गाढवापेक्षाही कमी आहे. हा घोडा येथील कासकडाच्या फार्म हाऊसमध्ये राहतो. तसेच इथे अनेक सामान्य उंचीचे घोडेही आहेत.
या घोड्याचे मालक पॅट्रीक आणि केटरजाइना यांच्यानुसार, या घोड्याला त्यांनी पहिल्यांदा २०१४ मध्ये पहिलं होतं. तेव्हा तो केवळ दोन महिन्यांचा होता. या घोड्याला पहिल्यांदा पाहिल्यावर त्यांना वाटलं की, याला काहीतरी झालं असावं. पण नंतर त्यांना कळालं की, या घोड्याची उंची वाढलीच नाही.
दरम्यान आतापर्यंतच्या सर्वात लहान घोड्याचं नाव थम्बेलिना होतं. ज्याचा २०१८ मध्ये मृत्यू झाला. या घोड्याची उंची केवळ ४४.५ सेंटीमीटर म्हणजे एक फूट पाचं इंच इतकी होती.