शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलमधील फेसलॉकही नाही सुरक्षित, झोपेत असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा दुरुपयोग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 13:11 IST

चेहऱ्याची ओळख करुन फोनचं लॉक उघडल्या जाणाऱ्या फेशिअल रिकग्निशन लॉक सिस्टीम असलेल्या मोबाइलची चांगली मागणीही वाढली आहे.

(Image Credit : Medium)

आजकाल वेगवेगळ्या नव्या टेक्नॉलॉजीसह बाजारात स्मार्टफोन येत आहेत. यात चेहऱ्याची ओळख करुन फोनचं लॉक उघडल्या जाणाऱ्या फेशिअल रिकग्निशन लॉक सिस्टीम असलेल्या मोबाइलची चांगली मागणीही वाढली आहे. पण ही टेक्निक सुद्धा आता सुरक्षित राहिली नाही. ताजं उदाहरण चीनचं आहे. इथे एका व्यक्तीच्या चेहऱ्याचा वापर करुन चोरांनी त्यांच्या बॅंकेतून लाखो रुपये लंपास केले होते. 

जेझियांग प्रांतात राहणाऱ्या युआन नावाच्या व्यक्तीने दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार दिली की, त्याच्या बॅंक अकाऊंटमधून साधारण १.२५ लाख रुपये अचानक गायब झाले आहेत. जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली गेली तेव्हा समोर आलं की, त्याच्या दोन मित्रांनी त्याच्या मोबाइलमध्ये असलेल्या वी-चॅट अॅपमधून फेसलॉक टेक्निकचा वापर करुन पैसे अकाऊंटमधून ट्रान्सफर केले होते. 

(Image Credit : MacRumors)

या व्यक्तीच्या दोन्ही मित्रांना अटक करण्यात आली आहे आणि त्याच्याकडून पैसेही परत घेतले गेले आहेत. पण त्या व्यक्तीकडे कोणत्या कंपनीचा फोन होता हे पोलिसांनी जाहीर केलेले नाही. पण या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीच्या फोनमध्ये असलेली फेसलॉक टेक्निक विश्वसनीय नव्हती. कारण अशा टेक्निकमध्ये व्यक्तीचे डोळे बंद असेल तर चेहऱ्याचा वापर करुन फोन अनलॉक नाही केला जाऊ शकत. पण व्यक्तीच्या फोनमध्ये अशी काही सिस्टीम नव्हती. 

(Image Credit : Pond5)

आजच्या काळात स्मार्टफोनमध्ये फेसलॉक टेक्निकचा वापर एक सुरक्षा फीचर म्हणून केला जातो. पण अनेक स्मार्टफोन कंपन्या यासाठी आयरिस स्कॅनिंगचा(डोळ्यांचं स्कॅनिंग) वापर करत नाही. आयरिस स्कॅनिंगशिवाय फोन अनलॉक करण्यात वेळही कमी लागतो. शांघाय नेटवर्क सिक्युरिटीचे फाउंडर तान जियानफेंग म्हणाले की, फिंगरप्रिंट आणि फेसलॉक उपयोगी टेक्निक आहे. पण हे पासवर्ड आणि पिनची जागा घेऊ शकत नाहीत. लोकांनीही खासगी माहिती पासवर्ड आणि पिनच्या मदतीनेच सुरक्षित ठेवली पाहिजे.

 

टॅग्स :chinaचीनtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल