शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

थोर तुझी माया! आईनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी चक्क पाय कापला, गरोदरपणात घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 10:59 IST

आईने तिच्या कृत्यातून हे नेहमी दाखवून दिलं आहे की, ती तिच्या बाळावर आपल्या जीवापाड प्रेम करते. अशाच एका आईनं आपल्या मुलासाठी अक्षरश: प्रेमाची सीमा ओलांडली. आपल्या न जन्मलेल्या मुलासाठी तिनं चक्क पाय कापला.

आई आपल्या मुलासाठी काहीही करु शकते आणि ते वेगळं सांगण्याची आता गरज नाही. आईने तिच्या कृत्यातून हे नेहमी दाखवून दिलं आहे की, ती तिच्या बाळावर आपल्या जीवापाड प्रेम करते. अशाच एका आईनं आपल्या मुलासाठी अक्षरश: प्रेमाची सीमा ओलांडली. आपल्या न जन्मलेल्या मुलासाठी तिनं चक्क पाय कापला.

या आईने आपल्या मुलाला सुरक्षितपणे जन्म देण्यासाठी आपल्या आयुष्याशी मोठी तडजोड केली आहे. तिच्या न जन्मलेल्या मुलासाठी, तिचा संपूर्ण पाय कापला आहे. ज्यामुळे या आईच्या धाडसाचं कौतुक लोकही करत आहेत आणि संपूर्ण प्रकरण तुम्हाला माहित झाल्यावर तुम्ही भावूक व्हाल.

तिला होता कॅन्सर२८ वर्षीय कॅथलीन ओसबोर्न, यूकेच्या विस्बेकमध्ये राहते, तिला गरोदरपणात कळले की, तिच्या पायात गाठ आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ही कॅन्सरची गाठ आहे. डॉक्टरांनी तिला सांगितले की, ती तिच्या पोटातील मुलाला जन्म न देता म्हणजेच अबॉर्शन करुन, केमो थेरपी घेऊ शकते, अन्यथा तिला तिचा पाय कापावा लागेल. परंतु आपल्या पोटच्या मुलाला न गमावता आईने तिच्या न जन्मलेल्या मुलाला वाचवण्यासाठी आपला पाय कापून टाकणे पसंत केले. या निर्णयानंतर, तिचा पाय गर्भधारणेच्या चौथ्या महिन्यात कापला गेला आणि मार्चमध्ये तिने प्रीमॅच्‍योर बाळाला जन्म दिला.

फक्त काहीच दिवस उरलेले.कॅथलीनला यापूर्वी दोनदा कॅन्सर झाला होता. यावेळी तिला तिच्या बाळासाठी पाय कापावा लागला परंतु तरीही ती खूप आनंदी आयुष्य जगत आहे. द सनच्या वृत्तानुसार कॅथलीन म्हणते, 'मी माझ्या निर्णयावर खूश आहे. मला माझ्या २ मोठ्या मुलांसाठी एक बहीण हवी होती.माझ्याकडे आता फक्त काही महिने किंवा वर्षे शिल्लक आहेत. या काळात, मला माझ्या मुलांसोबत वेळ घालवून छान आठवणी बनवायच्या आहेत. मुलंच आता माझ्या आयुष्यातील सर्व काही आहे, मला माझ्या स्वप्नांची पर्वा नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे, मला माझ्या मुलांसोबत आनंदाने जगायचे आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेWomenमहिला