शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

अंत्यसंस्काराच्या काही दिवसांनी मुलगा जिवंत घरी परतला, पण कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 14:27 IST

काही दिवसांनी त्यांचा बेपत्ता मुलगा जिवंत घरी परतला. त्याच्या जिवंत असण्याने तर सगळ्यांना धक्का बसला आहे.

गुजरातच्या अहमदाबादमधून एक अवाक् करणारी घटना समोर आली आहे. घटना समोर आल्यावर एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे असल्यासारखी वाटत आहे. एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर आपला मुलगा समजून त्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र, काही दिवसांनी त्यांचा बेपत्ता मुलगा जिवंत घरी परतला. त्याच्या जिवंत असण्याने तर सगळ्यांना धक्का दिलाच आहे. सोबतच हा प्रश्न उपस्थित झाला आहे की, ज्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ती व्यक्ती कोण होती?

मुलाने सोडलं होतं घर

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, परिवारातील मुलगा ब्रिजेशने आर्थिक तंगीला कंटाळून २६ ऑक्टोबर आईकडून ३ हजार रूपये घेऊन घर सोडलं होतं. कामावर जात असल्याचं त्याने सांगितलं होतं. पण तो परतला नाही. आईने त्याला अनेकदा फोन केले, पण त्याने काही उत्तर दिले नाही. ब्रिजेशचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा काही पत्ता लागला नाही. अशात कुटुंबियांनी पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

मृतदेह आणि अंत्यसंस्कार

नोव्हेंबरच्या सकाळी साबरमती नदीमध्ये एका अज्ञात तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी १० नोव्हेंबरला ब्रिजेशच्या कुटुंबियांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवलं होतं. कुटुंबियांना तो मृतदेह त्यांच्याच मुलाचा म्हणजे ब्रिजेशचा वाटला. ते मृतदेह गावी घेऊन गेले आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांना वाटलं त्यांनी मुलगा गमावला. अशात त्यांनी अंत्यसंस्कारानंतर सगळे रितीरिवाज पार पाडले.

ब्रिजेश परत आला आणि...

दरम्यान ब्रिजेशकडील सगळे पैसे संपले होते. अशात त्याने एका व्यक्तीच्या फोनवर मित्राला फोन लावला. त्याने मित्राला सांगितलं की, तो हरिद्वारला जाऊन साधू बनणार आहे. सध्या तो भुजमध्ये आईसोबत राहत आहे. त्याने मित्राकडे काही उधार पैसे मागितले. ज्यामुळे मित्राला त्याच्यावर संशय आला. मित्र लगेच ब्रिजेशच्या घरी गेला आणि परिवारातील लोकांना हे सगळं सांगितलं. कुटुंबियांनी ब्रिजेशला शोधून काढलं. मुलगा जिवंत असल्याचं पाहून सगळेच हैराण झाले. घरात आनंदाचं वातावरण तयार झालं.

मृतदेह कुणाचा?

या घटनेमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. परिवाराने ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले ती व्यक्ती कोण होती? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल