शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

आईच्या फोनवरून 2 वर्षांच्या मुलानं दिली 31 बर्गरची ऑर्डर, टिपमध्ये दिले एवढे पैसे अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 1:06 PM

आईला वाटले, मुलगा फोटो काढतोय...

आजकाल लहान मुले आणि मोबाईल, यांच्यात एक अतूट नातेच तयार झाल्याचे दिसते. ही मुले मोबाईलवर गेम खेळत आणि व्हिडीओ पाहत संपूर्ण दिवसही मोबाईलवर घालवू शकतात. काही मुले तर, मोबाईलमध्ये एढे मास्टर होतात, की ते पालकांच्या नकळतच काही तर धक्कादायक गोष्टी करून जातात. आई अथवा वडील मोबाईलवर काही काम करताना अथवा शॉपिंग करताना, ही मुले त्याच्याकडे लक्षपूर्वक लक्ष देऊन असतात आणि ते काय करत आहेत, हे समजून घेतात. यानंतर ही मुलेही तसेच काही तरी करण्याचा प्रयत्न करतात आणि मग काही तरी विचित्र गोंधळ निर्माण होतो.

2 वर्षांच्या मुलाने मोबाईलवरून ऑर्डर केले 31 चीजबर्गर -मुलांना मोबाईल आणि गॅजेट्सपासून दूर ठेवायला हवेत, कारण या उपकरणांमुळे मुले बिघडवू शकतात, असे तज्ज्ञ मंडळी सांगतात. आपल्याला एक दोन वर्षांचा मुलगा अयांश कुमार आठवतो, ज्याने न्यू जर्सीमध्ये आपल्या आईच्या फोनवरून तब्बल 2,000 डॉलरचे (1.4 लाख रुपये) फर्निचर ऑनलाईन ऑर्डर केले होते. आताही काहीसे असेच प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. टक्सासमध्ये एका 2 वर्षांच्या मुलाने आईच्या मोबाईलवरून तब्बल 31 चीजबर्गर ऑर्डर केल्याची घटना घडली आहे.

केवळ ऑर्डरच नाही, तर टीपसुद्धा दिली - अमेरिकेतील टेक्सासमध्ये, एका 2 वर्षाच्या मुलाने आपल्या आईच्या मोबाईलवरून मॅकडोनाल्डच्या आउटलेटमधून तब्ब्ल 31 चीजबर्गर ऑर्डर केले. एवडेच नाही, तर या मुलाने डिलिव्हरीसाठी 16 डॉलर सुमारे 1,200 रुपयांची टीपही दिली. केल्सी बुर्खाल्टर गोल्डन (Kelsey Burkhalter Golden) यांनी यासंदर्भात फेसबूकवर माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे, की त्यांचा मुलगा बॅरेटने डोरडॅश अॅपचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बर्गरची ऑर्डर दिली. या पोस्टसोबत संबंधित 2 वर्षांच्या मुलाचा फोटोही आहे. जो त्याने ऑर्डर केलेल्या चीजबर्गर्सच्या ढिगाऱ्याजवळ बसला आहे. ही ऑर्डरनंतर, रद्द करता आली नाही.

आईला वाटले, की मुलगा फोटो काढतोय -  या मुलाच्या आईने पुढे लिहिले, 'माझ्याकडे मॅकडॉनल्ड्सचे 31 चीजबर्गर आहेत. कुणाची इच्छा आहे का? माझा 2 वर्षांचा मुलाग डोरडॅशवरून ऑर्डर करणे जाणतो.' केल्सी म्हणाल्या, की आपण आपल्या मुलाला मोबाईल वापरताना बघितले. पण, तो फोटो काढतोय, असे आपल्याला वाटले. ऑर्डरचे एकूण बील 61.58 डॉलर एवढे होते आणि यात या मुलाने 16 डॉलरची टीपही दिली होती. याच बरोबर, हे अॅप हाईड करणे आवश्यक आहे, कारण ते सुरक्षित नाही, असेही केल्सी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिका