शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! चित्रपटात पाहिलेलं सत्यात घडलं, महिलेला अजगराने जिवंत गिळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 15:24 IST

लोकांनी अजगराचे पोट फाडून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. पाहा फोटो...

अॅनाकोंडा किंवा मोठ्या आकाराच्या अजगराने माणसाला गिळल्याचे तुम्ही चित्रपटात पाहिले असेल. अशाच प्रकारची धक्कादायक घटना सत्यात घडली आहे. एका महाकाय अजगराने 54 वर्षीय महिलेला जिवंत गिळले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अजगराला मारुन, महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शुक्रवारी महिला रबर घेण्यासाठी जंगलात गेली होती. दोन दिवसांनी महिलेला गिळलेला अजगर स्थानिक लोकांना सापडला.

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, ही आश्चर्यकारक आणि धक्कादायक घटना जाम्बी प्रांतात (इंडोनेशिया) घडली आहे. 54 वर्षीय जाराह शुक्रवारी रात्री जंगलातून अचानक बेपत्ता झाली. ती बेपत्ता झाल्यानंतर स्थानिकांनी तिचा शोध सुरू केला. दोन दिवसांच्या धडपडीनंतर या लोकांना जंगलात एक पोट फुगलेला अजगर सापडला. लोकांनी अजगराला ठार मारले आणि त्याचे पोट फाडून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. अशा महाकाय अजगरांना शिकार गिळण्यासाठी किंवा पचवण्यासाठी कित्येक आठवडे लागतात. पण या अजगराने जाराहच्या शरीराचा बराचसा भाग गिळला होता. अजगराचे पोट फाडल्यानंतर, ही बाब समोर आली. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आता महिलेच्या  मृत्यूनंतर स्थानिक लोक घाबरले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात लोकांना अनेक साप दिसले आहेत. यापूर्वी 27 फुटांचा अजगरही स्थानिक नागरिकांनी पकडला होता. यापूर्वी दोन शेळ्याही अजगराने गिळल्या होत्या. विशेष म्हणजे, इंडोनेशियामध्ये लांब आकाराचे अजगर मोठ्या प्रमाणात आढळतात. हे अजगर जंगलात आढळतात आणि मुख्यतः प्राण्यांना लक्ष्य करतात. यापूर्वी 2017 मध्ये अकबर सलुबिरो नावाच्या व्यक्तीचा मृतदेहही अजगराचे पोट फाडून बाहेर काढला होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरल