शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

हजारो वर्ष जुना दगड दोन भागात विभागल्याने जपानी लोक चिंतेत, पण त्यात इतकं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 11:47 IST

Sessho-seki aka The Killing Stone : एक प्राचीन जपानी शिलाखंडात हजारो वर्षाआधी एक 'राक्षस' कैद असल्याचा दावा केला जात होता. आता तो दगड रहस्यमयरित्या दोन भागात विभागला गेला आहे.

Sessho-seki aka The Killing Stone : आपण अनेकदा कथांमध्ये ऐकत असतो की, हजारो वर्षांआधी पृथ्वीवर राक्षस होते. पण आजच्या काळात यावर कुणीही विश्वास ठेवत नाहीत. मात्र, पौराणिक कथांमध्ये अशा गोष्टी नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना जपानमधून समोर आली आहे. एक प्राचीन जपानी शिलाखंडात हजारो वर्षाआधी एक 'राक्षस' कैद असल्याचा दावा केला जात होता. आता तो दगड रहस्यमयरित्या दोन भागात विभागला गेला आहे. असं सांगितलं जातं की, काही वाईट शक्तींमुळे असं झालं.

'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, सेशो-सेकी उर्फ द किलिंग स्टोन (Sessho-seki aka The Killing Stone) एक ज्वालामुखी दगड आहे. असं  मानलं जातं की, या दगडात एक वाईट आत्मा आहे आणि सेंट्रल जपानमध्ये एका सक्रिय ज्वालामुखीवर बसते. हे ठिकाण टोकियापासून जास्त दूर नाही. जपानी पौराणिक कथांनुसार, असं मानलं जातं की, या दगडात एक वाईट आत्मा राहते आणि इतकंच नाही तर ही आत्मा इतकी शक्तीशाली आहे की, याच्या संपर्कात जो कुणी येईल त्याचा जीव जातो.

५ मार्चला हा दगड दोन भागात विभागला गेला. त्यानंतर जपानी स्थानिक लोक आणि ऑनलाइन यूजर्सने यावर चिंता व्यक्त केली की, दगडातून सतत विषारी गॅस निघत आहे. असं म्हटलं जातं की, किलिंग स्टोनमध्ये तमामो-नो-माई (Tamamo-no-Mae) चा मृतदेह होता. जी एका सुंदर महिलेच्या रूपात दिसत होती. पण नंतर नऊ शेपट्या असलेल्या कोल्ह्याच्या रूपात समोर आली.

ज्वालामुखीतील दगडाने लोकांना केलं हैराण

जपानी पौराणिक कथांनुसार, तमामो-नो-माई एक शक्तीशाली जपानी सामंती प्रभूसाठी काम करत होता. जो ११०० च्या दशकात सम्राट टोबाला मारण्याचा प्लान करत होता. दगड तुटल्याची बातमी समोर येताच लोकांनी चिंता व्यक्ती केली आणि सिद्धांत समोर आणण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. एका व्यक्तीने लिहिलं की, 'हे फारच भीतीदायक आहे, आपल्याला आणखी अंधाराची गरज नाही'.

टॅग्स :JapanजपानJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स