शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सीमा हैदरच्या पाकिस्तानी मैत्रीणीचा दावा, म्हणाली - ती ड्रामा करत आहे, दगाबाज आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 09:29 IST

Seema Haider Story : पाकिस्तानी महिला सीमा हैदरवर वेगवेगळे आरोपही होत आहेत. स्वत:ला सीमाची बालपणीची मैत्रीण सांगणाऱ्या एका पाकिस्तानी तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Seema Haider Story : आपल्या चार मुलांना घेऊन पाकिस्तानातून भारतात आलेल्लाय सीमा हैदरच लव्हस्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या ती तिचा प्रियकर सचिनसोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे. सीमाला बघण्यासाठी सचिनच्या घरासमोर गर्दी होत आहे. अशात तिच्यावर वेगवेगळे आरोपही होत आहेत. स्वत:ला सीमाची बालपणीची मैत्रीण सांगणाऱ्या एका पाकिस्तानी तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या तरूणीने सांगितलं की, ती सीमाला बालपणापासून ओळखते. तिच्यावर राग व्यक्त करत ती म्हणाली की, मी तिला चांगलीच ओळखते. तरूणीचा आरोप आहे की, सीमा दगाबाज आणि खोटारडी आहे. ती हिंदू आणि पाकिस्तानसोबत दगा करत आहे तरूणी इतक्यावर थांबली नाही तर पुढे म्हणाली की, सीमा इस्लाम सोडून हिंदू बनली. येणाऱ्या दिवसात ती ख्रिश्चनही बनू शकते. 

तरूणीने असाही दावा केला की, सीमा खोटारडी आहे. तिचे अनेक पुरूष मित्र आहेत. ती सगळ्यांसोबतच असं करते. तरूणीच्या आरोपांची यादी इथेच संपली नाही. ती म्हणाली की, सीमा ड्रामा करत आहे. सीमा भारतात जाऊन क्रिकेट मॅच बघण्याबाबत बोलली होती. आता भारतात जाऊन तिने ड्रामा सुरू केला.

तरूणीने सीमाचा प्रियकर सचिनलाही सल्ला दिला आहे की, त्याने तिच्यापासून वाचून रहावं. ती फार मोठी दगाबाज आहे. तुझ्या परिवाराला दगा येईल. याआधी एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात एका तरूणाने स्वत:ला सीमाचा एक्स बॉयफ्रेंड सांगितलं होतं. 

या तरूणाने दावा केला होता की, सीमाने सचिनला पबजीवर कॉन्टॅक्ट केला होता. दोघांमध्ये बोलणं होत होतं. सीमा सगळंकाही सोडून त्याच्याकडे येण्यास तयार झाली. सीमाला क्रिकेटची खूप आवड आहे. तिला वर्ल्ड कप 2023 मॅच बघायच्या होत्या. यासाठी ती भारतात गेली आहे.

पाकिस्तानी तरूणीने व्हिडिओत सांगितलं की,  वर्ल्ड कप मॅच पासून सीमा पाकिस्तानात परत येईल. दुसरीकडे भारतात आलेली सीमा स्वत:ची ओळख सीमा सचिन अशी सांगते. असं सांगण्यात आलं आहे की, दोघांची लव्हस्टोरी पजबी गेम खेळताना सुरू झाली होती. दोघांनी भेटण्याचं ठरवलं आणि सीमा आपल्या चार मुलांना घेऊन नेपाळच्या मार्गे भारतात आली.

सीमाने दावा केला होता की,  'आम्ही 10 मार्चला पहिल्यांदा भेटलो. रात्रीचे 9 किंवा 10 वाजले असतील. आम्ही नेपाळमध्येच 13 मार्चला लग्न केलं. फार मोठं मंदिर होतं. ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो तिथून साधारण 10 मिनिटांवर मंदिर होतं. तिथेच आम्ही लग्न केलं'.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPakistanपाकिस्तान