(Image Credit : www.forbes.com)
जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये कितीतरी हिऱ्याच्या खाणी आहेत. या खाणींमधून छोटे-छोटे हिरे काढले जातात. पण इतिहासात असा हिरा आजपर्यंत कधीच सापडला नाही. जगात पहिल्यांदाच असं झालंय की, एखाद्या हिऱ्याच्या आत आणखी एक हिरा सापडला.
हा हिरा यकुशियाच्या न्यूरबा खाणीत सापडला असून हा हिरा ८० कोटी वर्षांपेक्षाही जुना असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.रशियातील सायबेरियन कंपनी अलरोसा पीजेएएसीनुसार, या हिऱ्याचं वजन ०.६२ कॅरेट आहे. तर हिऱ्याच्या आत असलेल्या हिऱ्याचं वजन ०.०२ कॅरेट आहे.
हिऱ्याच्या आत हिरा असल्याने याला रशियातील पारंपारिक बाहुली 'मॅट्रीओशका' सारखं मानलं जात आहे. तर या हिऱ्याची किंमत ४२६ कोटी रूपये असेल असा अंदाज लावला जात आहे.
अलरोसा कंपनीच्या रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट जिओलॉजिकल इंटरप्राइजेसचे उपनिर्देशक ओलेग कोवलचुक म्हणाले की, हिऱ्याच्या आत हिरा मिळण्याची ही निसर्गाची एक अनोखी रचना आहे.