शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video : महिलांसाठी नाही तर पुरूषांसाठी तयार केले होते सॅनिटरी पॅड, जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 17:00 IST

सॅनिटरी पॅड्सचं नाव ऐकताच आजही लोक नात-तोंड वाकडं करू लागतात. कारण हा याचा संबंध महिलांच्या मासिळ पाळीशी आहे.

सॅनिटरी पॅड्सचं नाव ऐकताच आजही लोक नात-तोंड वाकडं करू लागतात. कारण हा याचा संबंध महिलांच्या मासिळ पाळीशी आहे. त्यामुळे समाज सॅनिटरी पॅड्सला त्यांचांच भाग मानतात. पण महिलांसमोर सॅनिटरी पॅडचं नाव घेण्यासही लाज वाटणाऱ्या पुरूषांना हे माहीत नाही की, पहिल्यांदा हे पॅड महिलांसाठी नाही तर पुरूषांसाठी तयार करण्यात आले होते. 

माय पिरिअड ब्लॉगच्या एका पोस्टनुसार, सर्वात आधी सॅनिटरी पॅटचा वापर पहिल्या महायुद्धादरम्यान केला गेला होता. फ्रान्सचा नर्सनी पहिल्या महायुद्धावेळी जखमी सैनिकांचं वाहणारं रक्त रोखण्यासाठी पहिल्यांदा हे पॅड तयार केले होते. असे सांगतात की, हे नॅपकिन बेंजमिन फ्रेंकलिन यांनी एका आविष्कारातून प्रेरित होऊन तयार केले होते. 

त्यावेळी हे नॅपकिन तयार करताना काळजी घेण्यात आली होती की, याने सहजपणे रक्त शोषलं जावं. आणि एकदा वापर केल्यावर याला सहजपणे नष्ट करता यावं. जेव्हा फ्रान्सच्या सैनिकांसाठी सॅनिटरी पॅड तयार करण्यात आले, तेव्हा फ्रान्समध्ये काम करणाऱ्या अमेरिकन नर्सनी यांचा वापर मासिक पाळीदरम्यान करणे सुरू केले. 

१८८८ मध्ये कॉटेक्स नावाच्या कंपनीने युद्धात प्रयोग केल्या गेलेल्या आधारावरच 'सॅनिटरी टॉवल्स फॉप लेडीज' नावाने सॅनिटरी पॅडचं निर्माण सुरू केलं. १८८६ मध्ये याआधी जॉनसन अॅन्ड जॉनसनने लिस्टर्स टावल्स नावाने डिस्पोजबल नॅपकिन्स तयार करण्यास सुरूवात केली. 

(प्रातिनिधीक फोटो)

हे नॅपकिन्स रूईप्रमाणे दुसऱ्या फायबरला अब्जॉर्बेट लायनरने कव्हर करून तयार केले जात होते. पण हे त्यावेळी इतके महाग होते की, महिला त्या खरेदी करू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यावेळी केवळ श्रीमंत घरातील महिलाच सॅनिटरी नॅपकिनचा वापर करत होत्या.

(प्रातिनिधीक फोटो)

काळानुसार सॅनिटरी नॅपकिनच्या रूपात बराच बदल झाला. हळूहळू हे सामान्य महिलांसाठीही उपलब्ध होऊ लागले. पण आजही आपल्या देशात अनेक महिलांकडे सॅनिटरी पॅड खरेदी करण्यासाठी पैसे नसतात. आणि त्यामुळे त्या त्यांच्या सुरक्षेसाठी व आरोग्यासाठी याचा वापर करू शकत नाहीत. 

आजही सॅनिटरी नॅपकिनकडे किंवा मासिक पाळीकडे आपला समाज चांगल्या नजरेने बघत नाही. आजही यावर मोकळेपणाने चर्चा होत नाही. लोक आजही मासिक पाळी शब्द उच्चारला तरी अवघडतात. इतकंच काय तर आपल्याच शारीरिक प्रक्रियेबाबत महिला बिनधास्तपणे बोलू शकत नाहीत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय