शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या डुप्लिकेटच्या मागे लागले लोक, ओरडून ओरडून मागतोय मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 18:39 IST

Putin Lookalike : पुतिनसारखाच तो दिसत असल्याने त्याची नेहमी चर्चा होत असते. आज हेच कारण त्याच्यासाठी अडचण ठरत आहे.  या व्यक्तीला भीती आहे की, पुतिन समजून त्याला यूक्रेन आणि अॅंटी वॉर प्रोटेस्टर जीवे मारू शकतात.

(Image Credit : mirrorimages.co)

Russia-Ukraine Crisis : चूक दुसराच करणार आणि त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागली तर कुणालाही राग येईल. अशाच स्थितीतून एक व्यक्ती सध्या जात आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून ही व्यक्ती जीव मुठीत घेऊन जगतो आहे. तो स्वत:च्या जीवासाठी भीक मागत आहे. ही व्यक्ती आहे ब्लादिमीर पुतिन यांचा डुप्लिकेट (Putin Lookalike). पुतिनसारखाच तो दिसत असल्याने त्याची नेहमी चर्चा होत असते. आज हेच कारण त्याच्यासाठी अडचण ठरत आहे.  या व्यक्तीला भीती आहे की, पुतिन समजून त्याला यूक्रेन आणि अॅंटी वॉर प्रोटेस्टर जीवे मारू शकतात.

जगातला एकुलता एक प्रोफेशनल पुतिन यांचा डुप्लिकेट जीवाच्या सुरक्षेसाठी मदत मागत आहे. त्याने सांगितलं की, जेव्हापासून युद्ध सुरू झालं तेव्हा त्याला भीती आहे की, कधीही त्याच्यावर हल्ला होऊ शकतो. पोलॅंडच्या व्रोक्लॉवमध्ये राहणारा ५३ वर्षीय स्लाविक सोबला म्हणाला की, पुतिनच्या या स्पेशल मिलट्री ऑपरेशनची शिक्षा त्याला भोगावी लागू शकते. ज्या ठिकाणी स्लाविक राहतो तिथे प्रत्येक १० पैकी एक नागरिक यूक्रेनचा आहे. अशात त्याचा जीव धोक्यात आहे. लोकांच्या मनातील राग त्याच्या जीवावर बेतू शकतो.

'डेली स्टार'सोबत बोलताना स्लाविकने सांगितलं की, युद्धाआधी त्याला रस्त्याने फिरण्यात अजिबात भीती वाटत नव्हती. पण आता त्याला बाहेर फिरण्याची भीती वाटते. त्याला वाटतं की, त्याच्यावर अचानक कुठेही हल्ला होऊ शकतो. अनेक लोक त्याला आधीही म्हणत होते की, तू पुतिनसारखा दिसतो. आधी तो त्याच्या दिसण्याला ओळख मानत होता. पण आता हीच ओळख त्याच्यासाठी धोका बनली आहे. स्लाविकच्या पत्नीने सांगितलं की, स्लाविक पुतिनचा अभिनय पैशांसाठी नाही तर केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी करत होता. 

स्लाविकला यूकेमधील Lookalikes Agency रिप्रेझेंट करते. ही एजन्सीच स्लाविकचे सगळे शो स्पॉन्सर करते. गेल्या आठ वर्षापासून पुतिनचा डुप्लिकेट म्हणून काम करत आहे. यातून त्याला पैसे मिळतात. पण हा कमाईचा मुख्य मार्ग नाही. स्लाविकचा एक ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. तर पुतिन बनून तो एक्स्ट्रा पैसे कमावतो. पण रशियाने यूक्रेनवर हल्ला केला तर त्याचा पुतिनकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. आता त्याला पुतिनचा डुप्लिकेट म्हणून काम करायचं नाहीये. त्याने जीवाला धोका असल्याने सुरक्षेची मागणी केली आहे.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन