शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात दारूवरून राडा; नवरदेव भडकला, पोलीस ठाण्यात पोहोचला अन् भलताच प्रकार घडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 10:56 IST

आता तिच्या गावात मी पायसुद्धा ठेवणार नाही म्हणत नवरदेवानं थेट पोलीस ठाणं गाठलं

शाहजहापूर: उत्तर प्रदेशातील शाहजहापूरमध्ये एक भलताच प्रकार घडला आहे. लग्नात दारूवरून वाद झाल्यानं दोन्ही कुटुंबांनी थेट पोलीस ठाणं गाठलं. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नवरदेवानं मुलीच्या गावात पायसुद्धा ठेवणार नाही म्हणत संताप व्यक्त केला. त्यामुळे सगळेच पेचात पडले. अखेर पोलिसांना हा पेच सोडवण्यात यश आलं. रामचंद्र मिशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या तरुणीचा विवाह खुदागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खिरिया गावातील कमवेश वर्मासोबत निश्चित झाला. २१ मेच्या रात्री कमलेश वरात घेऊन मुलीच्या गावी पोहोचला. यावेळी दोन्ही बाजूंचे नातेवाईक उपस्थित होते. विधी संपन्न होते. रात्री १२ च्या सुमारास नवरदेवाचे नातेवाईक खूप दारू प्यायले. त्यांचा मुलीच्या नातेवाईकांशी वाद झाला. मुलीकडचे नातेवाईकदेखील दारू प्यायले होते. हे प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं.वाद वाढल्यानं नवरदेव सात फेरे घेण्यापूर्वीच गावाच्या बाहेर पडला. हळूहळू त्याचे नातेवाईकदेखील गावाबाहेर आले. नवरदेव वरात माघारी नेत असल्याचं पाहून मुलीच्या वडिलांनी रामचंद्र मिशन पोलीस ठाणं गाठलं. याची माहिती मिळताच मुलाकडची मंडळीदेखील पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या गावात माझ्या जीवाला धोका असल्याचं म्हणत नवरदेवानं गावात जाण्यास नकार दिला. अखेर पोलीस ठाण्यातच लग्न लावण्यास दोन्ही बाजूंनी तयारी दर्शवली. पोलीस ठाण्याच्या परिसरात खुर्च्या ठेवण्यात आल्या. त्यानंतर पोलीस आणि नातेवाईकांच्या साक्षीनं विवाह सोहळा संपन्न झाला.