शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाची कमाल! अनेक वर्ष मेलेल्या स्थितीत राहते ही अनोखी वनस्पती, पाण्याचा स्पर्श होताच पुन्हा होते हिरवीगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 15:30 IST

Rose of Jericho : वाळलेल्या पालापाचोळ्यासारखा हा भुरक्या रंगाचा गोळा पाण्याच्या संपर्कात येताच आपली पानं उघडू लागतो आणि हिरवागार होतो.

Rose of Jericho : आपण नेहमीच म्हणतो की, पाणी हे जीवन आहे. पण ते जीवन कसं आहे याचं मूर्तीमंत उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आपण कधी असं झाड पाहिलंय का जे अनेक वर्ष 'मेलेलं' राहतं, पण पाण्याचा स्पर्श होताच, पुन्हा जिवंत होतं? याच झाडाचा हा व्हिडीओ आहे. कदाचित असं झाड आपण कधी पाहिलं नसेल. रोज ऑफ जेरीचो (Rose of Jericho) असं या झाडाचं नाव आहे. 

वाळलेल्या पालापाचोळ्यासारखा हा भुरक्या रंगाचा गोळा पाण्याच्या संपर्कात येताच आपली पानं उघडू लागतो आणि हिरवागार होतो. हे फारच अद्भुत आहे. हे झाड मुख्यपणे मेक्सिको आणि अमेरिकेच्या चिहुआहुआ वाळवंटात आढळतं. याला लोक फुलही म्हणतात. या फुलाला लोक अमर मानतात. जे मरून पुन्हा जिवंत होतं.

या जादुई फुलाचं वैज्ञानिक नाव सेलागिनेला लेपिडोफिला (Selaginella lepidophylla) आहे. याला रिजनरेक्शन प्लांट, डायनासॉर प्लांट किंवा स्टोन फ्लॉवर असेही नावं आहेत. उन्हाळ्यात हे झाड आपल्या फांद्या, फुलं आत खेचून घेतं आणि एका गोळ्यात रूपांतरित होतं. या स्थितीत ते ९५ टक्क्यांपर्यंत गमावतं आणि पूर्णपणे निष्क्रिय होतं. जेव्हा याला पाणी मिळतं तेव्हा ते लगेच पुन्हा जिवंत होतं. वैज्ञानिकांनुसार, ही प्रक्रिया काही तासांमध्ये होते. या झाडामध्ये ट्रोहालोजसारखे विशेष तत्व असतात, जे उन्हाळ्यात कोशिकांचं रक्षण करतात. हेच कारण आहे की, हे झाड अनेक वर्ष विना पाणी जिवंत राहू शकतं.

ही वनस्पती केवळ विज्ञानाचा चमत्कार नाही, तर अनेक संस्कृती आणि धर्मांमध्ये त्याला विशेष महत्त्व आहे. ख्रिश्चन, सॅन्टेरिया आणि हूडू परंपरांमध्ये या वनस्पतीला पुनर्जन्म, नवजीवन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अनेक लोक ही वनस्पती घरी ठेवतात आणि ती शुभ मानतात. काही ठिकाणी त्याचा वापर आध्यात्मिक विधींमध्येही केला जातो. भारतामध्ये ही वनस्पती ऑनलाइन तसेच काही नर्सरीमध्ये उपलब्ध आहे. लोक त्याचा वापर घर सजावटीसाठी किंवा गिफ्ट म्हणून करत आहेत.

याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची काळजी घेणं खूप सोपं आहे. ही कोरडा गोळ्यासारखी दिसते आणि वेळोवेळी पाण्यात ठेवल्यावर पुन्हा जिवंत होते. मात्र, सतत पाण्यात ठेवले तर ती सामान्य वनस्पतीसारखी वाढू लागते. पण त्याची खरी ओळख म्हणजे कोरडा पडून पुन्हा जिवंत होण्याची क्षमता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rose of Jericho: Resurrection plant revives with water after years.

Web Summary : The Rose of Jericho, a resurrection plant, appears dead for years but springs back to life with water. Found in deserts, it curls up dry, conserving energy, then unfurls, turning green, showcasing nature's resilience. It's used spiritually and for decoration.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके