शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

एक असा हुकूमशहा जो दिवसातून 30 वेळा दारूने धुवत होता हात, कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 2:55 PM

हिटलर, किम जोंग उन, सद्दाम हुसैन असे अनेक या यादीत आहेत. असाच एक चर्चेतील हुकूमशहा म्हणजे रोमानियाचा निकोलस चाचेस्कू होता.

जगभरातील अनेक हुकूमशहांबाबत आजही चर्चा केली जाते. त्यांच्या सवयी, त्यांचं शाही जीवन याबाबत लोकांना जाणून घ्यायला आवडतं. काही लोकांना ते आवडतात तर काहींना आवडत नाहीत. हिटलर, किम जोंग उन, सद्दाम हुसैन असे अनेक या यादीत आहेत. असाच एक चर्चेतील हुकूमशहा म्हणजे रोमानियाचा निकोलस चाचेस्कू होता. चाचेस्कूने तब्बल 25 वर्ष देशावर राज्य केलं आणि लोकांच्या मनात अशी भिती निर्माण केली. ते त्याच्या विरोधात काही बोलत नव्हते आणि मीडियाही काही बोलत नव्हता. त्याने त्याचा इतिहास बनवण्याचा प्रयत्न केला, पण आज रोमानियाचा इतिहासच त्याला पसंत करत नाही.

तशी तर आजही अनेक हुकूमशहांची चर्चा केली जातं. पण निकोलस चाचेस्कूसारखा कुणी नाही झाला. असं म्हटसं जातं की, 60-70च्या दशकात चाचेस्कूने सर्वसामान्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचं एक गुप्त पोलीस दल तयार केलं होतं. जे लोकांच्या खाजगी जीवनावर लक्ष ठेवत होतं.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, रोमानियामध्ये भारताचे राजदूत राहिलेले राजीव डोगरा यांनी सांगितलं होतं की, चाचेस्कूच्या काळात बागेत बसलेल्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी तिथे एक गुप्तहेर बसलेला असायचा. लोकांना कळू नये म्हणून तो पेपरमध्ये एक छिद्र करू लोकांकडे बघत असे.

राजीव डोगरा यांच्यानुसार, चाचेस्कूच्या मृत्युच्या 10 वर्षांनंतरही रोमानियामध्ये लोक भितीच्या सावटाखाली जगत होते. ते त्याच्या सावलीला देखील घाबरत होते. त्यांना रस्त्याने चालताना देखील भिती वाटत होती. 

बीबीसीनुसार, रोमानियामध्ये लोक चाचेस्कूला 'कंडूकेडर' नावाने ओळखत होते. ज्याचा अर्थ होतो 'नेता'. त्याची पत्नी एलीनाला रोमानियाची राष्ट्रमाता असा किताब देण्यात आला होता. असं म्हणतात की, हुकूमशहाची मर्जी इतकी होती की, जेव्हा दोन फुटबॉल टीमचा सामना व्हायचा तेव्हा एलीना ठरवत होती की, कोणती टीम जिंकणार आणि हा सामना टीव्हीवर दाखवायचा की नाही हे सुद्धा ती ठरवत असे.

असे म्हणतात की, चाचेस्कूने देशभरात गर्भपातावर बंदी घातली होती आणि याचा उद्देश हा होता की, देशाची लोकसंख्या वाढावी. जेणेकरून देश एक विश्व शक्ती व्हावा. तसेच त्याने घटस्फोटावर बंदी घातली नव्हती, पण नियम इतके कठोर होते की, घटस्फोट देऊही शकत नव्हते आणि घेऊही शकत नव्हते.

असेही म्हटले जाते की, चाचेस्कूला स्वच्छतेचा आजार होता. तो एका दिवसात 20-20 वेळा त्याचे हात धुवत होत आणि तेही दारूने. त्याला भिती होती की, त्याला इन्फेक्शन होऊ नये. इतकेच काय तर तो 1979 मध्ये ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांना भेटायला गेला होता, तेव्हाही तो कुणाशीही हात मिळवल्यावर दारूने हात धुवत होता. त्याने बाथरूममध्येच हात धुण्यासाठी दारूच्या बॉटल्स ठेवल्या होत्या.

चाचेस्कूची दहशत इतकी वाढली होती की, रोमानियातील लोकांना व्यवस्थित खायला देखील मिळत नव्हते. पण फळं, भाज्या आणि मांस दुसऱ्या देशांमध्ये निर्यात केलं जात होतं. नंतर याच हुकूमशाही विरोधात लोकांनी आवाज उठवला आणि ठिकठिकाणी आंदोलने केली. याचा परिणाम असा झाला की, 25 डिसेंबर 1989 मध्ये चाचेस्कू आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली. कोर्टाने दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. तेव्हा चाचेस्कूच्या हुकूमशाहीचा अंत झाला.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके