शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील असा भिकारी ज्याच्याकडे आहे कोट्यावधी रूपयांची संपत्ती, मुंबई-पुण्यात आहेत फ्लॅट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 12:21 IST

भरत जैन नावाची व्यक्ती मुंबईतील छत्रपति शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदानात भिक मागतो.

भारतातच काय तर जगभरात भिक मागणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. तसेच अनेक भिक मागणाऱ्या लोकांबाबत अनेक अवाक् करणाऱ्या घटनाही समोर येत असतात. हे लोक रोज भिक मागून किती कमाई करतात किंवा त्यांच्या खात्यांमध्ये किती पैसे असतात हेही समोर येत असतं. भारतात असे अनेक भिकारी आहेत जे फार श्रीमंत आहेत. त्यातीलच एक भिकारी मुंबईत आहे. त्याचं नाव भरत जैन आहे. हा भिकारी कोट्याधीश असल्याचं सांगितलं जातं.

भरत जैन नावाची व्यक्ती मुंबईतील छत्रपति शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदानात भिक मागतो. असं काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, भरज जैन याच्याकडे मुंबईत आणि पुण्यात कोट्यावधी रूपयांचे फ्लॅट्स आणि दुकाने आहेत. इतकंच नाही तर त्याची मुले कॉन्‍व्हेंट स्‍कूलमध्ये शिकतात. तो स्वत: मुंबईत 1.20 कोटी रूपये किंमतीच्या फ्लॅटमध्ये राहतो. त्याने भिक मागून कोट्यावधी रूपयांची संपत्ती जमा केली आहे. तसेच त्याने भिक मागून आपला बिझनेसही सुरू केला. इतकी संपत्ती असूनही भरत जैन अजूनही भिक मागतो.

भिक मागून वर्षाला लाखोंची कमाई

कुटुंबियातील लोकांनी अनेक मनाई केली तरी भरत जैन अजूनही भिक मागण्याचं काम करतो. भरत जैनच्या परिवारात पत्नी, दोन मुले, एक भाऊ आणि वडील आहेत. भरत जैन दर महिन्याला भिक मागून साधारण 75 हजार रूपये कमाई करतो. म्हणजे दर दिवसाला सरासरी त्याची कमाई 2500 रूपये इतकी होते. वर्षाला तो 9 लाख रूपयांपर्यंत कमाई करतो. 

एका अंदाजानुसार, भरत जैनची एकूण संपत्ती 8.50 कोटी रूपये इतकी आहे. यात भिक मागण्याशिवाय त्याच्या बिझनेसमधून झालेलं उत्पन्नही आहे. भरत जैनकडे परळ भागात 2 बेडरूम, हॉल, किचन असलेला फ्लॅट आहे. त्याशिवाय ठाण्यात त्याच्याकडे दोन दुकाने आहेत. यातून त्याला दर महिन्याला 50 हजार रूपये भाडं मिळतं. 

पुण्यातही आहे घर

भरत जैनच्या ठाण्यातील दुकानांची किंमत कोट्यावधी असल्याचं सांगितलं जातं. भरतचा परिवार एक स्टेशनरी स्टोरही चालवतो. ज्यातूनही कमाई होते. त्याशिवाय त्याचं पुण्यातही घर आहे. जे त्याने भाड्याने दिलं आहे. अशात त्याची कमाई अजून जास्त होते.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके