शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात नशीब! आजोबांच्या सांगण्यावरून घेतलं लॉटरीचं तिकीट; 18 व्या वर्षी झाली अब्जाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 10:18 IST

एका 18 वर्षीय मुलीने 3 अब्ज रुपयांची लॉटरी जिंकली आहे.

लोक आयुष्यभर लॉटरी विकत घेतात पण एक रुपयाही जिंकत नाहीत. पण एका 18 वर्षीय मुलीने पहिल्याच प्रयत्नात लॉटरी जिंकण्याचा नवा विक्रम केला आहे. लाखो लोक त्यांचे नशीब उजळण्यासाठी लॉटरीची तिकिटे खरेदी करतात. या लॉटरीतून एक दिवस करोडपती होऊ शकतो, अशी त्यांना आशा असते. पण कल्पना करा जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील पहिली लॉटरी खरेदी केली आणि ती अब्जाधीश झाली तर ते एखाद्या जादूपेक्षा कमी नाही.

कॅनडातील एका 18 वर्षीय मुलीने 3 अब्ज रुपयांची लॉटरी जिंकली आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, कॅनडाच्या इतिहासात तिने या वयात सर्वात मोठी लॉटरी जिंकण्याचा विक्रम केला आहे. कॅनडाची 18 वर्षीय ज्युलिएट लॅमॉर लॉटरी जिंकली ती जॅकपॉटची सर्वात तरुण विजेती आहे. शुक्रवारी, ज्युलिएट लॅमॉरने 48 मिलियन कॅनेडियन डॉलर्स म्हणजे 2.9 अब्ज रुपये इतकी मोठी रक्कम मिळवली. सर्वात मोठा जॅकपॉट जिंकणारी ज्युलिएट ही सर्वात तरुण कॅनेडियन नागरिक ठरली आहे.

ज्युलिएट वयाच्या 18 व्या वर्षी झाली अब्जाधीश 

ज्युलिएटचे हे पहिले लॉटरीचे तिकीट होते. आता वयाच्या 18 व्या वर्षी ज्युलिएट अब्जाधीश झाली आहे. लॉटरीचे तिकीट खरेदी करणे हा निव्वळ योगायोग होता असे ज्युलिएटने सांगितले आहे. आजोबांनी तिला तिच्‍या 18 व्‍या वाढदिवशी लॉटरी खेळण्‍याची सूचना केली. लॉटरी कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अलीकडच्या काळात कॅनडात 18 व्या वर्षी अनेक विजेते बनले आहेत. पण ज्युलिएटने जितकी रक्कम जिंकली आहे तितकी रक्कम कोणत्याही विजेत्याने जिंकलेली नाही.

कुटुंबासह सहलीची तयारी 

ज्युलिएटने सांगितले की ती जिंकलेले पैसे तिच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहे. ज्युलिएट एक दिवस डॉक्टर बनून तिच्या समाजाची सेवा करण्याचे स्वप्न पाहते. या पैशातून ज्युलिएट सध्या आपल्या कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत आहे. ज्युलिएटने सांगितले की जेव्हा ती तिकीट घेण्यासाठी पोहोचली तेव्हा तिने तिच्या वडिलांना फोन केला आणि त्यांची मदत घेतली. त्यानंतर ती ऑफिसमध्ये आली. लॉटरी निघताच कार्यालयात लॉटरीची चर्चा सुरू झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके