शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

थेट राजीनामाच पाठवला! ऑफिसमधील 70 सहकाऱ्यांना निमंत्रण, आला फक्त एकच; तरुणी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 11:39 IST

खास लोकांनाच निमंत्रण दिले तर उगाच इतरांची नाराजी नको म्हणून तिने सर्वांनाच निमंत्रण दिले. सहकारी कर्मचाऱ्याचे लग्न आहे, सुटीचा दिवस आहे, सगळे येतील अशी तिची अपेक्षा होती.

ऑफिसमधील वातावरण कसे असावे, हे बहुतांशी कर्मचारी आणि त्यांच्या बॉसवर अवलंबून असते. अनेकदा बॉससोबत पटत नसल्याने राजीनामे दिले जातात. जोवर पटते तोवर ठीक, खटके उडायला लागले की कर्मचारी स्वत:ला मानसिक दृष्ट्या त्रास होत असल्याचे समजू लागतात. हे सर्वच कंपन्यांतील सर्वाधिकवेळा दिले जाणारे कारण आहे. परंतू, ऑफिसमधील सहकारी लग्नाला आले नाहीत, म्हणून कोणी राजीनामा देत असेल, तर हे नवीनच आहे. 

चीनमधील एका तरुणीने बॉसकडे लग्नानंतर थेट राजीनामा पाठविला आहे. या तरुणीचे लग्न ठरले होते. तिने ऑफिसमधील सरसकट ७० सहकर्मचाऱ्यांनाही निमंत्रण दिले होते. यात तिच्या काही खास होते, काहींशी तिचे पटत नव्हते, तर काहींशी ठीक ठाक संबंध होते. खास लोकांनाच निमंत्रण दिले तर उगाच इतरांची नाराजी नको म्हणून तिने सर्वांनाच निमंत्रण दिले. सहकारी कर्मचाऱ्याचे लग्न आहे, सुटीचा दिवस आहे, सगळे येतील अशी तिची अपेक्षा होती.

यासाठी तिने या सत्तर जणांनाही गृहीत धरून जेवणाची ऑर्डर दिली होती. परंतू लग्नामध्ये फक्त एकच सहकारी आली. तिला घरच्यांनी जेवन टाकून द्यावे लागले म्हणून झापले. तिला सर्व नाही पण तिच्याशी चांगले संबंध असलेले तरी येतील अशी अपेक्षा होती. जी आली ती तिची सेक्रेटरी होती. यामुळे ही तरुणी प्रचंड नाराज झाली. तिने लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी कंपनीला राजीनामा पाठवून दिला.  सहकर्मचारी उपस्थित न राहिल्यामुळे तिला भरपूर अन्न फेकून द्यावे लागले इतकेच नाही तर तिला तिच्या कुटुंबासमोर अपमानास्पद वाटले. ऑफिसचा विचार करताना देखील तिला अपमानास्पद वाटले, यामुळे तिने तडकाफडकी राजीनामा देऊन टाकला.  

टॅग्स :chinaचीनmarriageलग्न