शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लहानसा कोळी पण चावल्यामुळे महिलेला निर्माण झाला जीवघेण्या कॅन्सरचा धोका, समोर होता मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 18:02 IST

एक छोटासा कोळी फार फार तर काय करू शकणार, असंच आपल्याला वाटतं. पण तुम्ही विचारही केला नसेल इतका हा एवढासा कोळी भयंकर ठरू शकतो. याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे (Spider bite woman).

 घरामध्ये कोळ्याचं घर म्हणजे कोळ्याचं जाळं असतंच. कोपऱ्यातील ही जळमटं आपण कितीही स्वच्छ केली तरी आपल्याला वारंवार दिसतात. तरी जशी आपल्याला पाल, झुरळ यांची भीती वाटते, तितकी कोळ्यांची वाटत नाही. एक छोटासा कोळी फार फार तर काय करू शकणार, असंच आपल्याला वाटतं. पण तुम्ही विचारही केला नसेल इतका हा एवढासा कोळी भयंकर ठरू शकतो. याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे (Spider bite woman).

ऑस्ट्रेलियातील एका महिलेला कोळी चावला आणि तिला आता कॅन्सरचा धोका आहे. हाताला कोळी चावताच तिच्या हाताची अवस्था इतकी भयंकर झाली की तिचा हात कापण्याही वेळ ओढावली आहे. जेना एलन असं या महिलेचं नाव आहे.

28 वर्षांची जेना  2014 साली पुरात लोकांची मदत करत होती. त्यावेळी एका डब्यात तिने हात घातला आणि तिच्या हाताला कुणी तरी जोरात चावा घेतला. या डब्यात एक कोळी होता. जसा तिला कोळी चावला तसं काही वेळ तिच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यानंतर तिला उलट्या आणि जुलाब सुरू झाले. ती तात्काळ जवळच्या रुग्णालयात गेली. तिथून तिला तासाभराच्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं. तिथं तिला आयसीयूत ठेवण्यात आलं. तिथं उपचार घेतल्यानंतर दोन महिने ती व्हिक्टोरियातील बेंडिगो रुग्णालयात दाखल होती. तिथं तिची स्किन ग्राफ्ट म्हणजे त्वचेची सर्जरी झाली.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार सर्जरीच्या एक वर्षानंतर तिच्या त्वचेवर डास चावल्यासारखी जखम झाली. जखम वाढत गेली आणि काही कालावधीने ती फुटली. तिने डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली तेव्हा डॉक्टरांनी तिला तिच्या हाता कॅन्सर पेशी तयार होत आहेत आणि त्या हातावर पसरत असल्याचं सांगितलं.

आता कोळी चावल्याने इतरी भयंकर अवस्था कशी काय होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर महिलेला जो कोळी चावला तो साधासुधा नाही तर विषारी आणि खतरनाक कोळी आहे.

हा रेडबॅक स्पाइडर, ज्याला ऑस्ट्रेलियन ब्लॅड विडोही म्हटलं जातं. तो चावल्यानंतर अंगदुखी, पोटात वेदना, चक्कर येणं, हार्ट रेट वाढणं, बेशुद्ध होणं अशी लक्षणं दिसून येतात. हा कोळी चावल्यानंतर लगेच अँटीव्हेनमची गरज पडते. जिथं या महिलेला पहिल्यांदा दाखल करण्यात आलं तिथं हे अँटिव्हेनम नव्हतं. म्हणून तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके