शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हिटलरच्या मिशा अशा असण्यामागचं रहस्य? खुलासा वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 09:57 IST

हिटलरचे मोठमोठे डोळे आणि अजब मिशा नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. असं सांगितलं जातं की, हिटलरने या मिशा शेव्ह करण्यास मनाई केली होती.

हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरचा विषय निघाला की, कितीतरी गोष्टी समोर येतात. त्याचे अत्याचार कुणाला माहीत नसतील असं क्वचितच कुणी असेल. त्याच्या कारनाम्यांवर अनेक सिनेमे बनले आणि पुस्तके आली. त्याचे मोठमोठे डोळे आणि अजब मिशा नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. असं सांगितलं जातं की, हिटलरने या मिशा शेव्ह करण्यास मनाई केली होती.

इतकंच नाही तर त्याच्या मृत्यूच्या दिवशीही जेव्हा त्याने सोव्हिएत सैनिकांच्या हल्ल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेतली होती तेव्हाही त्याच्या मिशा व्यवस्थित ट्रिम करण्यात आल्या होत्या. 

'हिटलर्स लास्ट डे: मिनट बाय मिनट' नावाच्या पुस्तकात हिटलरच्या मिशांविषयी काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. 

जोनाथन मेयो आणि एम्मा क्रेगी द्वारे लिखित या पुस्तकात उल्लेख आहे की, मृत्यूच्या काही सेकंदानंतर हिटलरचा न्हावी ऑगस्ट वोलेनहॉट, त्याचे केस आणि मिशा ट्रिम करण्यासाठी बेडरूममध्ये येतो.

असं सांगितलं जातं की, हिटलरच्या मिशांची ही स्टाईल त्याचं मोठं नाक झाकण्यासाठी केली जात होती. असंही म्हटलं जातं की, मिशांच्या या स्टाईलची सुरूवात अमेरिकेत झाली होती. इथे या स्टाईलला टूथब्रश स्टाईल म्हटलं जात होतं.म्हणजे या पुस्तकातून स्पष्ट होतं की, हिटलरची ही अजब मिशांची स्टाईल त्याचं मोठं नाक झाकण्यासाठी असायची. कारण तो त्याच्या मोठ्या नाकाबाबत असुरक्षित होता. 

यानंतर हिटलरच्या मिशांबाबत आणखी एक खुलासा झाला. असं समोर आलं की, हिटलर नेहमी टूथब्रश स्टाईलने मिशा ठेवत नव्हता. सुरूवातीला त्याच्या मिशा त्याच्या वडिलांसारख्या हॅंडलबार मिशा होत्या.

द वर्ल्ड वॉर्स नामक एक हिस्ट्री चॅनल शो बघितल्यावर समजलं की, हिटलरने हॅंडलबार मिशा काढून टूथब्रश स्टाईलच्या मिशा का ठेवल्या?

शोमध्ये सांगण्यात आलं की, हिटलर जेव्हा तरूण होता आणि पहिल्या महायुद्धात एक सैनिक होता, तेव्हा त्याच्या हॅंडलबार मिशांमुळे त्याला गॅस मास्क व्यवस्थित लावता येत नव्हता. ज्यामुळे त्याने या मिशा काढल्या.

शो चे कार्यकारी निर्माता स्टीफन डेविड यांनी द रॅपला सांगितलं की, त्याला मिशा काढण्याचा आदेश देण्यात आला नव्हता. पण मुळात जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा त्याने मिशा काढल्या.

दरम्यान, जर्मनीत जेव्हा नाझी पार्टीची सत्ता आली तेव्हाही हिटलरने आपल्या मिशांची स्टाईल कायम ठेवली. पहिल्या महायुद्धानंतर ही स्टाईल अशी काही ट्रेंड झाली की, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान ती फॅशन बनली होती.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके