शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

"मीच खरा मोगली", व्यक्तीचा अजब दावा; 8 व्या वर्षी बेपत्ता, प्राण्यांसोबत जीवन जगला अन् आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 13:55 IST

वयाच्या आठव्या वर्षी बेपत्ता झाल्यानंतर तो जंगलात प्राण्यांसोबत राहत होता.

एका व्यक्तीने तो खऱ्या आयुष्यात मोगली असल्याचा दावा केला आहे. वयाच्या आठव्या वर्षी बेपत्ता झाल्यानंतर तो जंगलात प्राण्यांसोबत राहत होता. एल्सिओ अल्वेस डो नॅसिमेंटो असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, 1978 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी त्याचं त्याच्या भावासोबत खेळण्यावरून भांडण झालं होतं. त्यानंतर तो घरातून निघून गेला.

ब्राझीलचा रहिवासी असलेल्या एल्सिओने तो जंगली प्राण्यांमध्ये कसा राहतो हे सांगितलं. भावासोबत झालेल्या भांडणानंतर काय झालं याचं वर्णन करताना तो म्हणतो, माझे वडील खूप कडक होते, त्यांनी मला काठीने मारलं आणि मग मी नदीत पडेपर्यंत पळत राहिलो. मी पोहत किनाऱ्यावर पोहोचलो, पण तोपर्यंत मी हरवलो होतो. आता एल्सिओ 53 वर्षांचा आहे.  डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, त्याने सांगितलं की, तो घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. एक रात्र जंगलात घालवली. नुसतं चालत राहिलो पण जंगलातून बाहेर पडू शकलो नाही. पावसाळ्यात तो एका गुहेत झोपायचा आणि फळं, नारळ आणि इतर गोष्टी खायचा. अनेक वेळा त्याच्यावर प्राण्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण गुहा आणि झाडांवर चढून त्याने स्वतःला वाचवले. 

मला समजले की येथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. मी जमिनीवर झोपलो नाही. नेहमी झाडावर झोपायचो असं त्याने सांगितलं. एल्सिओ उत्तर-पूर्व ब्राझीलमधील बाहिया राज्यातील बॅक्सियो गावात लाइफगार्ड म्हणून काम करतो. वयाच्या 11 व्या वर्षी एका शेतकऱ्याने त्याला जंगलात पाहिलं. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. पण जंगलात घालवलेल्या 3 वर्षांचा त्याच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला आहे. 

जंगलात राहिल्यामुळे आवाज कर्कश झाला आहे. बाहेर कसं खायचं हे शिकायला त्याला वेळ लागला. आजारी पडल्यानंतर रुग्णालयात जावं लागलं. जंगलात प्राण्यांसारखं जगणं सोपं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्या नातेवाईकांना वाटलं की मी मेलो आहे. त्यांनी मला शोधणं बंद केलं होतं. माणसांसारखं जगायला शिकल्यानंतर एल्सिओ स्वयंपाक करायला शिकला. त्यानंतर त्याने लग्नही केलं आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके