शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नशेडी उंदरांचा अजब कारनामा, गांजा खाऊन फस्त केले पोलिसांचे अनेक रेकॉर्ड्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 10:10 IST

उंदरांचा फारच अवाक् करणारा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही कधी उंदरांना नशा केल्याचं ऐकलंय का? नक्कीच ऐकलं नसेल. 

जगभरात सतत अशा अनेक घटना घडत असतात ज्यांबाबत ऐकून अनेक विश्वास बसत नाही. कधी मनुष्य प्राण्यांसारखे वागू लागतात तर कधी तर कधी प्राण्यांचे अजब किस्से समोर येत असतात. असाच एक उंदरांचा फारच अवाक् करणारा किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही कधी उंदरांना नशा केल्याचं ऐकलंय का? नक्कीच ऐकलं नसेल. 

उंदरांना तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी खाताना पाहिलं असेल. कागद, धान्य, अन्न उंदीर सगळंच खातात. पण त्यांना नशा करताना तुम्ही पाहिलं नसेल. आज अशाच काही नशेडी उंदरांचा किस्सा सध्या चर्चेत आहे. त्यांना गांजाचा नशा केला अन् पोलिसांची अडचण वाढवली.

अमेरिकेच्या लुसियाना पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली. पोलीस स्टेशनमध्ये येऊन उंदरांना गांजा सेवन केला आणि अशी नशा चढली की, इमारतीतील पोलिसांचे अनेक पुरावे-रेकॉर्ड खाऊन टाकले. इथे लुसियाना पोलीस स्टेशनच्या जुन्या इमारतीत उंदीर आणि खूप झुरळं आहेत. उंदरांनी येथील गांजा खाल्ला आणि मग जो काही धिंगाणा घातला की, पोलीस आता वैतागलेत. अनेक केसेसमधील पुरावे त्यांनी खाऊन टाकले.

या घटनेबाबत पोलीस अधिकारी एनी किर्कपॅट्रिकने सांगितलं की, उंदीर गांजा खाऊन नशेत आहे. आता याचा शोध घेतला जात आहे की, उंदरांना गांजा कुठून मिळाला. त्यांना ही सवय कशी लागली. घाण आणि कचऱ्यामुळे उंदीर आणि झुरळं पोलीस स्टेशनमध्ये येत आहेत. अशात आता पोलीस स्टेशन दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचा विचार केला जात आहे. जेणेकरून अशा घटना पुढे घडू नये. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका