शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या पुरस्कार विजेत्या आर्टिस्टचा आणखी एक रेकॉर्ड; १०० किलोचं आयसिंग स्ट्रक्चर बनवत जागतिक विक्रमाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:14 IST

पुण्यातील एका पुरस्कार विजेत्या केक आर्टिस्टने १०० किलो वजनाचं वेगन रॉयल आयसिंग स्ट्रक्चर बनवत केला जागतिक रेकॉर्ड केला आहे.

पुण्यातील एका पुरस्कार विजेत्या केक आर्टिस्टने १०० किलो वजनाचं वेगन रॉयल आयसिंग स्ट्रक्चर बनवत केला जागतिक रेकॉर्ड केला आहे. पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीची केक आर्टिस्ट प्राची धबल देब (Prachi Dhabal Deb) हिने ही कामगिरी केली आहे. युनायटेड किंगडममधील जगप्रसिद्ध केक आयकॉन सर एडी स्पेन्स एमबीई यांच्या मार्गदर्शनाखाली रॉयल आयसिंगची क्लिष्ट कला शिकलेल्या प्राचीने आता हे यश मिळवले आहे.

याशिवाय प्राची हिनं सर्वाधिक वेगन रॉयल आयसिंग स्ट्रक्चरचा आणखी एक खिताबही जिंकला आहे. तिनं इन्स्टाग्रामवरुन यासंदर्भातील माहिती दिली. "केवळ एकच नाही, तर दोन जागतिक विक्रमाचे टायटल्स" असं तिनं याला कॅप्शन दिलं आहे. याशिवाय तिनं 'आकारमानाने मोठं रॉयल आयसिंग स्टक्र्चर,' असंही तिनं आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टमध्ये नमूद केलं आहे. प्राचीनं भव्य इटालियन मिलान कॅथेड्रल आयसिंगच्या माध्यमातून साकारलं आहे. प्राची रॉयल आयसिंगच्या क्लिष्ट कलेमध्ये माहिर आहे. तसंच युरोपियन आर्किटेक्चरने प्रेरित असलेल्या एग्लेस रॉयल आयसिंग स्ट्रक्चर्ससाठी ती प्रसिद्ध आहे. तिने युनायटेड किंगडममध्ये अनुभवी रॉयल केक आयकॉन सर एडी स्पेन्स एमबीई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कला आत्मसाद केल्याचीही माहिती आहे. ब्रिटीश शाही कुटुंबासाठी केक डिझाईन करण्यासाठी वापराला जाणारा हा अत्यंत कठीण असा कलाप्रकार मानला जातो. 

"मी यासाठी अनेक वर्षांपासून खुप मेहनत घेतली. या कामाचं कौतुकही झाल्यामुळे मी सर्वांची आभारी आहे. माझ्या या कामगिरीची लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानपूर्वक दखल घेतली. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे," अशी प्रतिक्रिया प्राचीनं दिली. कॅथेड्रल साकारण्यासाठी जवळपास १५०० पिसेसची आवश्यकता असल्यानं त्याच्या नियोजन आणि तयारीला बराच कालावधी लागला. मी एकटीनं प्रत्येक पिस तयार केला आणि त्यानंतर ते पिस एकत्र करण्यासाठी सुमारे एका महिन्याचा कालावधी लागला. या कॅथेड्रलचे सर्व पैलू साकारणं हे एक मोठं आव्हान होतं, परंतु ही प्रतिकृती साकारण्यात आपल्याला आनंद झाल्याचंही तिनं म्हटलं. तिनं साकारलेली मिलान कॅथेड्रलची प्रतिकृती ४ फुट ६ इंच उंच आहे.

टॅग्स :Puneपुणेfoodअन्न