शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! महिन्याला तब्बल 8 लाख कमवतो 'हा' भिकारी; सत्य समजताच बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:23 IST

एका महिन्यात तब्बल 8 लाख रुपये कमावतो, तेही केवळ भीक मागून.

जगभरातील लोक पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. अनेक वेळा गोष्टी इतक्या विचित्र असतात की त्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. अलीकडेच चीनमधील एक 'भिकारी' यामुळे चर्चेत आला आहे. हा व्यक्ती एका महिन्यात 70,000 युआन म्हणजेच तब्बल 8 लाख रुपये कमावतो, तेही केवळ भीक मागून. धक्कादायक बाब म्हणजे ही व्यक्ती प्रत्यक्षात भिकारी नसून तो एक प्रोफेशनल एक्टर आहे.

गेल्या 12 वर्षांपासून एक्टर लू जिंगांग एका लोकप्रिय पर्यटन स्थळावर भिकाऱ्यासारखे वागत आहे. जेणेकरून लोकांना त्याची कीव येते. तसेच लोकांनी दिलेल्या पैशातून तो आपलं जीवन जगत आहे. लू जिंगाँगकडे बघून, तुम्हाला वाटेल की तो एक गरीब भिकारी आहे जो कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपले जीवन जगतो आहे. पण सत्य वेगळच आहे. तो खरोखर खूप हुशार आहे.

आपला घाणेरडा चेहरा, उदास डोळे आणि फाटलेल्या कपड्यांसह तो पर्यटकांना आपण भिकारी असल्याचं अगदी बरोबर भासवतो. अभिनेता दरमहा 70,000 युआन म्हणजे 8 लाखांपर्यंत कमावतो आणि लोक त्याला चांगले अन्न देखील देतात. टाइम डॉक्टरच्या मते, चीनमध्ये सध्या सरासरी मासिक पगार सुमारे 29,000 युआन (3.33 लाख रुपये) आहे, ज्यामुळे लू जिंगांग आशियाई देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींपैकी एक बनला आहे. काही लोक त्याला चीनचा सर्वात श्रीमंत भिकारी म्हणू लागले आहेत.

लू म्हणतो की, त्याने करिअरचा हा असामान्य मार्ग निवडला कारण त्याला फक्त अभिनयाची आवड होती आणि त्यामुळे त्याला ऑडिशन न देता असे करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला कुटुंबीयांनी त्याला साथ दिली नाही, पण उत्पन्न पाहून कुटुंबही आता साथ देत आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल