शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Jara hatke: अवघ्या १३ फुटांच्या घराची किंमत ५ कोटी, तरीही खरेदीसाठी लोकांची गर्दी, अशी आहे खासियत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 17:00 IST

Jara hatke News: ब्रिटनमधील किंग्स्टन अँड चेल्सियामधील एका प्रॉपर्टीची किंमत भारतीय चलनामधील ५ कोटी रुपये एवढी लावण्यात आली आहे.

लंडन -  कुठलेही घर खरेदी करण्यासाठी सर्वात आधी त्याची लांबी-रुंदी, इंटिरियर आणि लोकेशन पाहिले जाते. मात्र ब्रिटनमधील किंग्स्टन अँड चेल्सियामधील एका प्रॉपर्टीची किंमत भारतीय चलनामधील ५ कोटी रुपये एवढी लावण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा फ्लॅट केवळ १३ फुटांचा आहे. तरीही त्यांची किंमत दिवसेंदिवस वधारत आहे.

ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. मात्र त्याची लांबी केवळ १३ फूट आहे. बाहेरून हे घर जेवढं अरुंद दिसतं तेवढाच सुंदर या घराचा आतील इंटिरियर आहे. या घराचा सर्वात लांब भाग हा समोरून मागच्या बाजूला १३ फुटांचा आहे.  Purple Bricks कडून विकल्या जाणाऱ्या या फ्लॅटमध्ये स्टोरेजचीसुद्धा उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

हे घर कुठल्याही फिल्मी प्रॉपप्रमाणे भासते. घराबाहेर अजिबात स्पेस नाही आहे. मात्र आत गेल्यावर पांढऱ्या भिंती आणि मोठमोठ्या खिडक्या लक्ष वेधून घेतात. तसेच या घरात कॉरिडॉरही उपलब्ध आहे. या फ्लॅटमध्ये दोन डबलबेड रूम आहेत. तसेच एक मोठा लिव्हिंग रूम आहे. तसेच एक शॉवर रूमही उपलब्ध आहे. आश्चर्याची बाब म्हणजे. या एवढी कमी जागा असलेल्या घरात एक छोटा बगिचाही तयार करण्यात आला आहे. छोटं घर असूनही सुंदर दिसावं यासाठी हे घर अगदी स्मार्टपणे डिझाईन करण्यात आले आहे.

हे घर थर्लो स्क्वेअरमध्ये बांधण्यात आले आहे. येथून जवळच साऊथ केनिंसिंग्टन ट्यूब स्टेशन आहे. तर त्याच्या अगदी समोर एक सुंदर पार्क आहे. त्यामुळे अगदी कमी जागा असूनही या कमी जागेच्या घराच्या खरेदीसाठी लोक अधिकाधिक उत्सुकता दाखवत आहेत. या घराच्या एका बाजूला डॉक्टरांचे सर्जरी क्लिनिक आहे. तर दुसरीकडे हेअरड्रेसिंग सलून आहे. ५ फ्लोअरच्या या घराचे एकूण क्षेत्रफळ १०३४ स्क्वेअर मीटर आहे. इंग्लंडमध्ये याआधीही एक १.६६ मीटरचे घर ६ कोटींहून अधिक रकमेला विकले गेले होते.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEnglandइंग्लंडInternationalआंतरराष्ट्रीय